Hyderabad Gazetteer” : जरांगेंचे आंदोलन मिटण्याच्या मार्गावर, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय

Hyderabad Gazetteer” : जरांगेंचे आंदोलन मिटण्याच्या मार्गावर, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय

Hyderabad Gazetteer

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Hyderabad Gazetteer सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांना दिली. या प्रकरणी 2-3 मुद्यांवर कायदेशीर त्रुटी आहेत. पण सरकारने त्यावरही 15 दिवसांत योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे, असे सांगून मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत दिले आहेत.Hyderabad Gazetteer

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज (बुधवार) पाचवा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला अधिक तीव्र रूप येत असतानाच, मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासनाला आंदोलकांना दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर पोलिसांकडून त्यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यावर जरांगेंनी मराठे कुणाला घाबरत नाही, मागण्यापूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वातील सरकारचे एक शिष्टमंडळ आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. हे शिष्टमंडळ आपल्यासोबत मराठा आरक्षणाचा अंतिम मसुदा घेऊन गेले होते.Hyderabad Gazetteer



जरांगे याविषयी बोलताना म्हणाले, सरकारने हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. सातारा संस्थानच्या गॅझेटियरमध्ये पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण बसतो. सातारा गॅझेटियर तथा पुणे व औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याच्या मुद्यावर कायदेशीर बाबी तपासून जलदगतीने निर्णय घेण्यात येईल असे सरकारने सांगितले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सगेसोयरेच्या अध्यादेशावर 8 लाख हरकती आल्याचे जरांगे यांना सांगितले. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगेंना सातारा गॅझेट लागू करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर जरांगेंनी यासाठी सरकारला 1 महिन्याचा वेळ देण्याची तयारी दर्शवली.
दरम्यान,
मुंबई हायकोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. कोर्ट या मुद्यावर उद्या दुपारी 1 वाक्य पुन्हा सुनावणी करणार आहे. त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर एखादा ठोस निर्णय येण्याची शक्यता आहे. जरागेंचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाला उद्या सकाळी 11 वाजेपर्यंतची मुदत देण्याची विनंती केली होती. त्यानुसार कोर्टाने ही मुदत दिली आहे.

राज्याचे महाधिवक्ते बीरेंद्र सराफ यांनी सरकारकडून युक्तिवाद करताना पोलिसांकडून उचलण्यात येणाऱ्या पावलांची माहिती दिली. ते म्हणाले, मनोज जरांगे यांनी लिखित स्वरुपात किंवा लोकांना आवाहन करून आंदोलनकर्त्यांना मुंबई सोडण्यास सांगावे. आम्ही आंदोलकांना कोर्टाचे आदेश सांगण्यासाठी उद्घोषणा केल्या, सगळीकडे बॅनर व एलईडी स्क्रिनही लावल्या आहेत. त्यानंतर आता गर्दी कमी झाली आहे. काही भागात अजूनही मोठ्या प्रमाणात वाहने आहेत. काही लोक ऐकत आहेत, तर काही लोक अजिबात ऐकत नाहीत.

“Jarange’s Protest Nearing Resolution as Decision Taken to Implement Hyderabad Gazetteer”

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023