विशेष प्रतिनिधी
मुंबई : Khalid Ka Shivaji ‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातील काही दावे, संदर्भ यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची जोरदार मागणी हिंदू महासभेने केली आहे. त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसेच निर्मात्याला पत्र पाठवले आहे.Khalid Ka Shivaji
हा चित्रपट 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून तो कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवडला आहे. त्याचा ट्रेलर झळकल्यानंतर यात काही आक्षेपार्ह बाबी असल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे. त्यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे.Khalid Ka Shivaji
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात 35 टक्के मुसलमान होते, शिवाजी महाराजांचे 11 अंगरक्षक मुसलमान होते तसेच किल्ले रायगडावर मशीद बांधल्याचा निर्मात्याने उल्लेख केला आहे. हा शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास असल्याचा दावा हिंदू महासभेने केला आहे. निर्मात्याने शिवाजी महाराजांचे विकृतीकरण केले आहे, त्यांना धर्मनिरपेक्ष दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आनंद दवे यांनी एका वृत्तवाहिनीवर केला आहे. तर हे सर्व दावे करताना कुठलेही ऐतिहासिक संदर्भ दिलेले नाहीत, याकडे महंत सुधीरदास महाराज यांनी लक्ष वेधले आहे. त्याचवेळी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात आनंद दवे यांनी चित्रपट निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मुळात चित्रपटाचे नाव खालिद का शिवाजी असणे हेच चुकीचे आहे, असा आरोप दवे आणि महंत सुधीरदास महाराजांनी केला आहे. एक मुस्लीम शाळकरी विद्यार्थी शिवरायांच्या जीवनमूल्यांचा शोध घेतो, अशी या चित्रपटाची कथा आहे. राज प्रितम मोरे दिग्दर्शित आणि कैलास वाघमारे लिखित या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, सुषमा देशपांडे, भारत गणेशपुरे, स्नेहलता तागडे, कैलास वाघमारे आदी कलाकार आहेत. यातील खालिदची भूमिका क्रिश मोरे या कलाकारने साकारले आहे.
Khalid Ka Shivaji’s film is in a whirlwind of controversy even before its release
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!