विशेष प्रतिनिधी
मुंबई : Manoj Jarange मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने कूच केलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आंदोलनाच्या दोन दिवस आधी आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी मिळाली आहे. मात्र त्यासोबतच त्यांना आठ अटी ठेवण्यात आल्या आहेत. आझाद मैदानातील आंदोलन स्थळाची जागा मर्यादित असल्यामुळे येथे फक्त पाच हजार पर्यंतच आंदोलकांना येण्याची परवानगी असणार आहे. त्यात इतरही संघटनांचे आंदोलन असले, याचीही काळजी मराठा आरक्षण आंदोलकांना घ्यावी लागणार आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी बुधवारी मुंबईच्या दिशेने कूच केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मुंबईत आंदोलन करण्यास मनाई केलेली असताना ते निघाले आहेत. एकीकडे मुंबईतील गणेशोत्सव आणि गणेशभक्तांची गर्दी, दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागचा राजा दर्शनासाठी 29, 30 ऑगस्टला मुंबईत येणार आहेत.Manoj Jarange
मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलनाचा निर्धार कायम ठेवून सरकारला कात्रीत पकडले आहे. तर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे, मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त एक दिवसाची परावनागी मुंबई पोलिसांनी दिली आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतच ही परवानगी आहे. त्यामुळे सरकारने मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषणाचे आंदोलन एका दिवसावर आणले असल्याची चर्चा आहे.
मुंबई पोलिसांनी अटीशर्तींवर आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यातील अट क्रमांक 6 नुसार, आंदोलनाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 6 याच वेळेसाठी दिलेली असून त्यानंतर आंदोलकांना मैदानात थांबता येणार नाही, असेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे सायंकाळी 6 वाजता आंदोलकांना मैदान रिकामे करावे लागणार आहे.
अट क्रमांक 8 नुसार, आंदोलनाच्या कालावधी दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात साजरा होत आहे, त्यानुसार गणपती विर्सजन दरम्यान रहदारीस कोणताही अडथळा किंवा नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याप्रकारचे आपल्याकडून आणि आपल्या आंदोलकाकडून असे कृत्य होणार नाही. तसेच आपल्या आंदोलन कार्यक्रमात लहान मुले, गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना सहभागी केले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही सांगितले आहे.
या दोन अटींचे मराठा आरक्षण आंदोलकांना काटेकोर पालन करावे लागणार आहे. अट क्रमांक तीन मध्ये म्हटले आहे की, आझाद मैदानातील जागा पाच हजार लोकांसाठीच आहे. तिथे इतरही संस्था, संघटनांचे आंदोलन सुरु असणार आहे. त्यांच्या आंदोलनाला अडथळा येणार नाही आणि त्यांची लोकं पकडून मैदानाची क्षमता पाच हजार असणार आहे. त्यामुळे मराठा आंदोलकांना मोठ्या प्रमाणात मैदानात जाण्यासही मज्जाव होण्याची शक्यता आहे.
आंदोलकांनी आणलेल्या वाहनामुळे मुंबईमध्ये वाहतूकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यावयाची आहे. या सर्व अटींची पूर्तता करुन मनोज जरांगे यांना आंदोलनाची परवानगी दिली आहे.
Manoj Jarange allowed to protest at Azad Maidan but only till 6 pm
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा