Manoj Jarange :आझाद मैदानात आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी पोलिसांना दिले हमीपत्र

Manoj Jarange :आझाद मैदानात आंदोलनासाठी मनोज जरांगे यांनी पोलिसांना दिले हमीपत्र

Manoj Jarange

विशेष प्रतिनिधी

मुंबई:Manoj Jarange मुंबई उच्च न्यायालयाने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आझाद मैदानात पोलिसांच्या परवानगीशिवाय आंदोलनास मनाई केली होती. त्यानंतर
मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिल्यानंतर, त्यांनी पोलिसांना हमीपत्र सादर केले आहे. या हमीपत्रात जरांगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच पोलिसांच्या अटी-शर्तींचे पालन करण्यासाठी 20 आश्वासने दिली आहेत.Manoj Jarange

आंदोलनादरम्यान कायदा मोडला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करूनच सर्व कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे हमीपत्र मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीसह त्यांच्या प्रतिनिधींनी आझाद मैदान पोलिस ठाण्यात सादर केले.Manoj Jarange

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी आयोजकांनी पोलिसांना काही महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. आयोजकांनी स्पष्ट केले आहे की, कोणताही पोलिस अधिकारी परवानगीपत्राची मागणी केल्यास मूळ प्रत सोबत बाळगली जाईल. याशिवाय पोलिसांशी सतत संपर्क ठेवण्यासाठी पांडुरंग मारक या जबाबदार व्यक्तीची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
सभा किंवा धरणे दरम्यान पिण्याच्या पाण्याची सोय (टँकरद्वारे) आणि प्राथमिक उपचार/वैद्यकीय मदत यांची व्यवस्था नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी समन्वय साधून केली जाईल. आंदोलने पूर्णपणे सुव्यवस्थित होतील, वाहतुकीस अडथळा येणार नाही आणि पार्किंग तसेच वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, याची आयोजकांनी ग्वाही दिली आहे.

सहभागी होणाऱ्यांची संख्या आयोजकांच्या निवेदनात नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक होणार नाही, अशी हमीही देण्यात आली आहे. पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुरेशा संख्येने स्वयंसेवक तैनात केले जातील आणि त्यांची संपर्क यादी आगाऊ स्वरूपात पोलिसांना पुरवली जाईल.

सभा-निदर्शने केवळ परवानगी दिलेल्या ठिकाणी आणि सकाळी ९:३० ते संध्याकाळी ५:३० या निश्चित वेळेतच घेतली जातील. ध्वज किंवा फलकांसाठी दोन फूटांपेक्षा लांब काठ्या वापरल्या जाणार नाहीत, तसेच फलकाचा आकार ९ फूट बाय ६ फूटांपेक्षा मोठा असणार नाही. सहभागी व्यक्तींनी ध्वज किंवा फलक फक्त प्रदर्शनाच्या हेतूनेच वापरायचे आहेत.

याशिवाय सहभागी कोणतीही व्यक्ती लाठ्या, भाले, तलवारी, अग्निशस्त्रे किंवा अशा धोकादायक वस्तू बाळगणार नाही, याची आयोजकांनी खात्री दिली आहे. मानवी जीवितास धोका पोहोचवेल, दंगा उसळेल किंवा सार्वजनिक शांततेला बाधा आणेल अशी कोणतीही कृती किंवा शस्त्र सोबत ठेवले जाणार नाही.

तसेच, जमावाला भडकवणारी भाषणे केली जाणार नाहीत. धर्म, जात, भाषा, वंश, जन्मस्थान या कारणांवरून शत्रुत्व निर्माण होईल अशी कोणतीही भाषा किंवा कृती करण्यात येणार नाही. सामाजिक सलोखा बिघडवेल अशा गोष्टी टाळल्या जातील.

आयोजकांनी हमीपत्रातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आणि प्रत्येक परिस्थितीत पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

Manoj Jarange gave an undertaking to the police for the protest at Azad Maidan.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023