विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत पोहोचले असून त्यांच्यासोबत मराठा कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो मराठ्यांसह मुंबईत पोहोचलेत. ते येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. यासाठी तिथे जय्यत तयारी करण्यात आली आहे. Manoj Jarange Patil
तसेच खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटाही तिथे तैनात आहे. या आंदोलनामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अडथळे आलेअसून, मुंबई पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. फ्री वे रोडचा वापर टाळा असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केले आहे. आझाद मैदानात आंदोलन असल्याने फ्री वे रोडचा वापर टाळा, कृपया त्यानुसार नियोजन करा असे नागरिकांना सांगण्यात आले आहे.
आरक्षणाच्या निकराच्या लढाईसाठी 28 ऑगस्ट रोजी दुपारपासून आंदोलक मुंबई, नवी मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली होती. नवी मुंबईतील बाजार समिती, सिडको प्रदर्शन केंद्र, तेरणा विद्यालयासह जागा मिळेल तेथे आंदोलकांनी मुक्काम केला होता. मध्यरात्री चाकणवरून मनोज जरांगे पाटील याचा ताफा निघाल्यानंतर प्रत्येक टप्यावर सकल मराठा समाजाकडून स्वागत केले जात होते.
नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर सकाळी सव्वासहा वाजता आंदोलक दाखल झाले. येथे घोषणांनी स्वागत करण्यात आले. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. हजारो आंदोलकांसोबत मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले आहेत. वाशी टोलनाका ते वाशी प्लाझा पर्यंत आंदोलकांच्या वाहनांची रांग, घोषणा देत टोल नाका ओलांडला.
Manoj Jarange Patil arrives in Mumbai; Large number of Maratha workers gather
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा