Milind Deora : चौफेर टीका झाल्यावर आंदोलन स्थलांतरीत करण्याच्या मुद्द्यावरून मिलिंद देवरांचं घुमजाव

Milind Deora : चौफेर टीका झाल्यावर आंदोलन स्थलांतरीत करण्याच्या मुद्द्यावरून मिलिंद देवरांचं घुमजाव

Milind Deora

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Milind Deora आझाद मैदानात यापुढे आंदोलन होऊ देऊ नका, अशी मागणी करणारे पत्र शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले होते. मात्र यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर आता मिलिंद देवरा यांनी घुमजाव केला आहे.Milind Deora

दक्षिण मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर असलेले आझाद मैदान हे आंदोलन करण्याचे प्रमुख ठिकाण आहे. नुकतेच या मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण केले होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत आले होते. त्यामुळे पाच दिवस मुंबई ठप्प झाली होती. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात मिलिंद देवरा यांनी म्हटले की, दक्षिण मुंबईतील आझाद मैदान आणि इतर ठिकाणी वारंवार होणाऱ्या निदर्शने आणि मोठ्या संख्येने होणाऱ्या मेळाव्यांबद्दल मी तुम्हाला खोलवर चिंतेत लिहित आहे. आंदोलन करण्याचा अधिकार हा एक आवश्यक लोकशाही स्वातंत्र्य असला तरी, तो सामान्य नागरिकांच्या जगण्याच्या आणि व्यत्ययाशिवाय काम करण्याच्या अधिकारांशी संतुलित असला पाहिजे. कारण दक्षिण मुंबई हे केवळ आपल्या राज्याच्या प्रशासनाचे हृदय नाही तर त्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र देखील आहे. याठिकाणी महाराष्ट्र सरकारचे सचिवालय (मंत्रालय), विधानसभा, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांची कार्यालये तसेच पश्चिम नौदल कमांड आहे. ते वित्तीय संस्था, कॉर्पोरेट मुख्यालय आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे केंद्र देखील आहे. ज्यावर लाखो लोक दररोज अवलंबून असतात, असे त्यांनी म्हटले होते.Milind Deora

जगातील कोणतेही राजधानी शहर आपल्या प्रशासन, सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य संस्थांना वारंवार निदर्शनांमुळे अपंग होऊ देत नाही. शांततापूर्ण निदर्शने लोकशाहीचा अविभाज्य भाग असली तरी, त्यांचे स्थान आणि प्रमाण सरकार, नगरपालिका प्रशासन, सुरक्षा दल किंवा खाजगी क्षेत्राच्या कामकाजाला कमकुवत करू नये. म्हणूनच मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की त्यांनी दक्षिण मुंबईच्या उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत. यामुळे नागरिकांचे हक्क सुरक्षित राहतील, प्रशासनात व्यत्यय येईल आणि मुंबई महाराष्ट्र आणि भारताची निर्विवाद आर्थिक आणि राजकीय राजधानी म्हणून कार्यरत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र विरोधकांनी टीका केल्यानंतर आता मिलिंद देवरा यांनी आपल्या मागणीवर घुमजाव केला आहे.

मिलिंद देवरा यांनी ट्वीट करताना म्हटले की, मी नेहमीच असा विश्वास ठेवला आहे की, आंदोलन करणे हा प्रत्येक भारतीयाचा घटनात्मक अधिकार आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत मी राहतो याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले माझे पत्र हे मुंबईत आंदोलनं बंद करण्यासाठी नव्हते, तर ती शिस्तबद्ध पद्धतीने व्हावीत आणि रोजंदारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वसामान्य कष्टकरी मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी होते. मी सांगू इच्छितो की, दररोज किमान दोनदा खोटं बोलणार्‍या, मानसिक उपचारांची तातडीने गरज असलेल्या आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीला तिलांजली देऊन राजकीय फायद्यासाठी मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्याआधी, माझं पत्र नीट वाचा, असे आवाहन मिलिंद देवरा यांनी केले आहे.

Milind Deora’s hesitation on the issue of relocating the protest after all-round criticism

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023