विशेष प्रतिनिधी
Mumbai News: शेवगाव-पाथर्डी महामार्गावर रविवारी दुपारी मुसळधार पावसात दोन दुचाकींची जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले. याचवेळी घटनास्थळाजवळून प्रवास करत असलेल्या महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आपला ताफा थांबवला आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेल्या. त्यांनी स्वतः पुढाकार घेत जखमींना तातडीने मदत केली.
जोरदार पावसात अपघात पाहून अनेकांनी पुढे जाण्याचा मार्ग निवडला, परंतु मंत्री बोर्डीकर यांनी तात्काळ आपल्या ताफ्यातील पोलीस वाहन थांबवले आणि जखमींना आधार दिला. त्यांनी जखमींची विचारपूस केली आणि ताफ्यातील पोलीस वाहनाचा रुग्णवाहिकेप्रमाणे उपयोग करत जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून जखमींना तात्काळ वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी स्पष्ट सूचना दिल्या.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. तरीही स्थानिक नागरिक, पोलीस आणि राज्यमंत्र्यांच्या कर्मचाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. स्थानिक रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे सांगितले आहे.
मेघना बोर्डीकर यांनी रुग्णालयातील उपचारांचा पाठपुरावा केला असून, जखमींच्या पूर्ण बरे होण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्याची ग्वाही दिली आहे. Meghna Bordikar
Minister of State Meghna Bordikar stopped in heavy rain to provide immediate assistance at the accident site
महत्वाच्या बातम्या