विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत एका बाजूला पावसाने थैमान घातले असताना प्रचंड गर्दीमुळे मोनो रेल बंद पडली. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे सुमारे 442 प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. त्यापैकी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुमारे 200 प्रवाशांना वडाळा स्थानकात परत आणण्यात आले आहे. Monorail
चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती. सव्वातासाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून या प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यात आले आहे. वाढलेल्या गर्दीमुळे हा प्रकार घडल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.
चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावणारी मोनोरेल म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ अचानक बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 196 या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरु केले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीन स्नोर्केल वाहनांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले होते. दोन तासांच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून मोनो रेलच्या काचा फोडून आणि दरवाजा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तीन शिड्यांच्या मदतीने या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
Monorail closed due to heavy crowd, 442 passengers rescued
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला