विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mukesh Ambani उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल उचलले असून ‘रिलायन्स इंटेलिजन्स’ या नव्या कंपनीची स्थापना केली आहे. या निमित्ताने त्यांनी जागतिक तंत्रज्ञान कंपनी मेटा सोबत भारतासाठी खास असा AI संयुक्त उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली.Mukesh Ambani
“आज मला आनंदाने सांगायचे आहे की, आम्ही आमचे जवळचे भागीदार मेटा सोबत भारत-केंद्रित AI संयुक्त उपक्रमाची सुरुवात करत आहोत. यामध्ये आम्ही ओपन-सोर्स AI ची ताकद आणि रिलायन्सची विविध क्षेत्रांतील सखोल ज्ञान एकत्र आणत आहोत,” असे अंबानी यांनी स्पष्ट केलेMukesh Ambani
नव्या ‘रिलायन्स इंटेलिजन्स’ या उपकंपनीबद्दल ते म्हणाले, “ही कंपनी चार ठोस ध्येयांसाठी उभारली आहे. त्यातील पहिले म्हणजे भारताची पुढील पिढी घडविणारे AI पायाभूत संरचना निर्माण करणे.”Mukesh Ambani
या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट भारतीय उद्योग-व्यवसायासाठी एंटरप्राइज-रेडी AI उपलब्ध करून देणे आहे. रिलायन्स इंटेलिजन्स मेटाच्या AI मॉडेल्सचा वापर करणार असून ऊर्जा, रिटेल, दूरसंचार, मीडिया आणि उत्पादन क्षेत्रात याची अंमलबजावणी होणार आहे.
मुकेश अंबानी यांनी सांगितले, “मेटा सोबतचे हे भागीदारी प्रकल्प ओपन मॉडेल्स आणि साधनांचा उपयोग करून भारतासाठी सार्वभौम आणि एंटरप्राइज-रेडी AI उपलब्ध करून देईल. यामुळे भारतीय कंपन्या जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यास सक्षम होतील.”
ही घोषणा झाल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी चर्चा रंगली असून, भारतीय AI क्षमतेसाठी हा टप्पा निर्णायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Mukesh Ambani’s big announcement: Establishment of ‘Reliance Intelligence’, Make in India AI with Meta
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा