Mumbai airport : मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक ठप्प, प्रवाशांची मोठी गर्दी

Mumbai airport : मुंबई विमानतळावरील नेटवर्क अचानक ठप्प, प्रवाशांची मोठी गर्दी

Mumbai airport

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbai airport मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरीवल नेटवर अचानकपणे ठप्प झाले आहे. त्यामुळे चेक-इन व बोर्डिंग ‘मॅन्युअल मोड’वर गेले असून येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.Mumbai airport

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी नेटवर्क फेल झाल्याने सर्व प्रणाली ठप्प झाल्या. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया तात्पुरती मॅन्युअल पद्धतीने सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, प्रणालीत बिघाड झाल्याने विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्कालीन सेवा सक्रिय करण्यात आल्या आहेत. नेटवर्कमध्ये आलेल्या गडबडीमुळे बोर्डिंग पास छापण्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवा वेळापत्रक बिघडले असून, अनेक उड्डाणे विलंबाने होत आहेत.Mumbai airport

पावसाळ्यात मुंबईच्या लोकलचे वेळापत्रक हमखास खोळंबलेले पाहायला मिळते. रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात वाहनांचे ट्रॅफिक झालेले दिसते. दरम्यान, आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेटवर्क अचानकपणे ठप्प झाले आहे. अचानक नेटवर्क ठप्प झाल्याने येथे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. परिणामी येथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या विमानतळावरील सर्व्हरच डाऊन झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे विमानांचे उड्डाणही उशिराने होत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो, एयर इंडिया, अकासा, विस्तारा या विमान कंपन्यांना मोठा आर्थिक तसेच अन्य फटका बसत आहे. तांत्रिक बिघाडामुळे मुंबई विमानतळावर हळू हळू प्रवाशांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे आता हा तांत्रिक बिघाड दूर करून सर्व्हर पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशी करत आहेत.

विमानतळाचे आयटी आणि कोर टीम तातडीने बिघाडाचे कारण शोधून नेटवर्क दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्व विभागांना आपत्कालीन नियमांनुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व सिस्टीम लवकरच पुन्हा सुरू होतील अशी अपेक्षा आहे. मात्र, तोपर्यंत प्रवाशांना या मॅन्युअल प्रक्रियेमुळे विलंब आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बिघाडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी सिस्टीम अचानक क्रॅश झाल्याचे सांगितले जात आहे.

या तांत्रिक समस्येमुळे इंडिगो, एअर इंडिया, अकासा, विस्तारा यांसारख्या विमान कंपन्यांना मोठे आर्थिक नुकसान होत आहे. उड्डाणे उशिराने होत असल्याने प्रवाशांनाही अडचणी येत आहेत. सिस्टीम पूर्ववत होईपर्यंत गर्दी वाढतच जाण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात एअर इंडियाने X पोस्ट करत लिहिले की, थर्ड पार्टी डेटा नेटवर्क आउटेजमुळे मुंबई विमानतळावरील चेक-इन सिस्टीमवर परिणाम झाला, ज्यामुळे एअर इंडियासह इतर विमान कंपन्यांच्या उड्डाणांना विलंब झाला. त्यानंतर ही सिस्टीम पुनर्संचयित करण्यात आली आहे, तथापि, परिस्थिती हळूहळू सामान्य होत असताना आमच्या काही उड्डाणांवर काही काळ परिणाम होऊ शकतो.

Mumbai airport network suddenly shuts down, huge rush of passengers

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023