विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nana Patekar आज या ठिकाणी इतकी मंडळी जमली आहेत, शोकसभेच्या ठिकाणी जर अजितदादांचा आज 75वा वाढदिवस साजरा करायला जमलो असतो, तर जास्त बरं वाटलं असतं,” असे म्हणत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी अजित पवार यांच्या फोटोसमोर हात जोडले आणि श्रद्धांजली वाहिली. भावूक होत ते स्टेजवरून खाली उतरले आणि थोडावेळ एका बाजूला निस्तब्ध उभे राहीले. नाना पाटेकर यांचे हे रूप पाहून इतर उपस्थित मंडळीही भावूक झाल्याचे दिसून आले.Nana Patekar
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्य हादरले. समाजकारण, राजकारणाशिवाय सिनेक्षेत्रातही त्यांची एक वेगळी ओळख होती. सोमवारी, अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईतील वरळी डोम येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, नेते, उद्योजक, अभिनेते यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी या शोकसभेत उपस्थित होती. यावेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी स्टेजवर आलेल्या अभिनेते नाना पाटेकर यांचे गहिवरलेले रूप सर्वांना पाहायला मिळाले. यावेळी श्रद्धांजली वाहण्यासाठी ते स्टेजवर तर आले, पण बोलता बोलता ते भावूक झाले आणि 4 शब्द बोलून खाली उतरले.Nana Patekar
अजित पवारांशी जवळचे संबंध असलेले अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की, “नमस्कार, माझा आणि दादांचा 50 वर्षांचा संबंध होता. दादा कार्यकर्ते होते. मी कधी बारामतीला गेलो, तर माझी सगळी उठबस अजितदादा पाहत होते. अजित दादा तेव्हा 18 ते 19 वर्षांचे असतील आणि मी 25 तर शरद पवार हे 35 वर्षांचे असतील. 50 वर्षांचा खूप मोठा सहवास आहे. खूप जास्त आठवणी आहेत.
सोमवारी वरळी डोम येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शोकसभा ठेवण्यात आली होती. या शोकसभेला देशातील आणि राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते. उद्योगपती आणि कलाकारांनीही हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तसेच, उद्योजक गौतम अदानी, मुकेश अंबानीदेखील उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अजित दादांच्या आठवणींना खास उजाळा दिला. तसेच अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
Nana Patekar Overcome with Emotion Remembering Ajit Pawar, Unable to Continue Speech
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका