विशेष प्रतिनिधी
मुंबई: महायुती सरकार हिंदूंच्या मतांनी निवडून आले आहे. आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही. हिंदू मतांमुळे आज आम्ही आमदार, मंत्री झालो. त्यामुळे हिंदूंचेच हित पाहणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
मुंबईतील मानखुर्द येथे बाेलताना नितेश राणे म्हणाले की, हा देश हिंदूराष्ट्र आहे. इथे सर्वधर्म समभाव चालणार नाही. याठिकाणी आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल. त्यानंतर बाकीचे…महाराष्ट्र सरकार हिंदुत्ववादी विचारांचे आहे. तुम्ही तुमचे सण शांततेत करा, आम्ही आमचे सण उत्साहात साजरे करू. कुणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघायचे नाही. आमच्या दुर्गामातेचे विटंबना करणाऱ्यांना जिथे कुठे लपले असतील, त्यांना शोधून अटक केली जाईल. मुंबईत कुणीही वातावरण खराब करायचा प्रयत्न करत असेल तर आमचे देवाभाऊंचे सरकार कुणालाही सोडणार नाही, हे तुमच्या आकाला सांगा.
आमच्या देवीची विटंबना कुणी केली तर त्याला सोडणार नाही. ज्या जिहादींनी हे कृत्य केलंय ते जास्त दिवस २ पायावर चालणार नाही हा शब्द आहे असा इशारा देत राणे म्हणाले, आम्ही आमचे सण कुणालाही न दुखावता साजरे करत असू तर कुणाला हिरव्या मिरच्या लागण्याची गरज नाही. या देशात सर्वात आधी हिंदूंचे हित पाहिले जाईल, त्यानंतर बाकीच्यांचे हित बघितले जाईल. हनवरात्र उत्साहात साजरी करा, जर कुणी परवानगी नाकारली तर आम्हाला फोन करा. तुमच्या घरापर्यंत आम्ही परवानगी घेऊन येऊ.
No one wearing a round cap or beard voted, Nitesh Rane said he will look after the interests of Hindus only
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!