विशेष प्रतिनिधी
मुंबई: Pawar and Thackeray पवार-ठाकरे यांच्या भूमिकेला वैचारिक बैठकच नाही. ही तर फक्त राजकीय स्वार्थाची नौटंकी आहे. आमच्या विचारांचे नाहीत’ म्हणून नाकारणे हा विचारांचा संकुचितपणा आणि राजकीय द्वेषाचा कळस आहे. नक्षलवाद्यांप्रती सौम्य भूमिका ठेवणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणे, हे तर थेट देशाच्या सुरक्षेशी खेळणे, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे.Pawar and Thackeray
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार राष्कधाकृष्णन यांना पाठिंबा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, प्रखर राष्ट्रवाद, संविधानावर श्रद्धा आणि सर्वसमावेशक राजकारण असा इतिहास असलेली व्यक्ती आमच्या विचाराची नाही असे शरद पवार उघडपणे सांगतात, मग त्यांची नेमकी विचारसरणी कोणती, असा सवाल महाराष्ट्राने त्यांना विचारला पाहिजे. पक्षाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस हे नाव आणि राष्ट्रवादी विचारास विरोध हा त्यांच्या कथनी आणि करणीतून उघड झाला आहे.Pawar and Thackeray
त्यामुळे, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही केवळ विरोधाभासी नाही, तर थेट राष्ट्रहिताविरोधी आहे. संविधाननिष्ठ, स्पष्टवक्ते आणि राष्ट्रभक्तीचा विचार जोपासणारे राधाकृष्णन यांना ‘आमच्या विचारांचे नाहीत’ म्हणून नाकारणे हा विचारांचा संकुचितपणा आणि राजकीय द्वेषाचा कळस आहे. नक्षलवाद्यांप्रती सौम्य भूमिका ठेवणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणे, हे तर थेट देशाच्या सुरक्षेशी खेळणे!
नक्षलवाद हा भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी गंभीर धोका असून, अशा विचारसरणीला पाठबळ देणाऱ्या व्यक्तीला उपराष्ट्रपतीपदासाठी योग्य मानणे म्हणजे जनतेशी विश्वासघातच! ज्या आंध्र प्रदेशातून इंडिया आघाडीचा उमेदवार उभा आहे, त्याच राज्यातील प्रमुख नेत्यांनी राधाकृष्णन यांना पाठिंबा दिला आहे. यावरून एकच स्पष्ट होते- पवार-ठाकरे यांच्या भूमिकेला वैचारिक बैठकच नाही. ही तर फक्त राजकीय स्वार्थाची नौटंकी आहे, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी शुक्रवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरील आपली भूमिका विषद केली. ते म्हणाले, उपराष्ट्रपती पदाच्या मुद्यावर आम्ही सर्वांनी मिळून 2-3 नावांची चर्चा केली. त्यानंतर सर्वांचे एकमत झाले. सत्ताधाऱ्यांकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत म्हणून सहकार्य करावे ही विनंती केली. तथापि मी ते शक्य नाही असे सांगितले. कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत. माझी संजय राऊतांशी बोलणे झाले असून त्यांचीही चर्चा झाली. त्यांचा आणि आमचा निर्णय एकच आहे. आम्ही आमचे बघतो, त्यांनी काय करायचे, ते ठरवतील, निकाल वेगळा लागेल.
“Not an ideological stand but a selfish drama, BJP slams Pawar and Thackeray”
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार