विशेष प्रतिनिधी
मुंबई : Chief Minister Devendra Fadnavis परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारे आता बिहारमध्ये जाऊन महाराष्ट्राला बदनाम करत आहेत. पण यांना ना परदेशात कोणी विचारले, ना बिहारमध्ये कोणी विचारेल. जी परिस्थिती यांची महाराष्ट्रात झाली, तीच परिस्थिती बिहारमध्ये होणार आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केली.Chief Minister Devendra Fadnavis
मुंबईत रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आपला भाऊ, देवा भाऊ या कार्यक्रमात ते बोलत होते. लाडकी बहीण योजना ही ५ वर्ष कोणीही बंद करणार नाही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.Chief Minister Devendra Fadnavis
जगाच्या पाठीवर अमेरिका, युरोप, जपान, कोरिया ज्या देशांनी विकास केला त्या देशाच्या लोकसंख्येतील ५० टक्के सहभाग महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तीत करून देशाच्या मुख्यधारेत, अर्थव्यवस्थेत आणण्यात आले. तसे केल्यास देशाच्या विकासाची गती दुपटीने वाढेल. यामुळे ते विकसित अर्थव्यवस्थेकडे गेले तसेच मोठ्या प्रमाणात विकसित झाले. आता तीच भारताची वाटचाल सुरू झाली आहे. पुढच्या २० वर्षात भारत जगातील पहिली किंवा दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. यामध्ये तुमची भागीदारी महत्त्वाची असणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
Now Maharashtra is being defamed in Bihar, Chief Minister indirectly criticizes Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींची चोरी पकडल्याचा राग, काँग्रेसकडून पत्रकार शिव अरोर यांच्याविरुद्ध एफआयआर
- शक्ती संवाद : महिला सक्षमीकरणाच्या बरोबरच भारतीय संघराज्य व्यवस्थेतला सुसंवाद वाढविण्याचाही सक्षम प्रयोग!!
- Jarange Supporters : जरांगे समर्थक आक्रमक, लक्ष्मण हाकेंना चपलेचा प्रसाद देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस
- … म्हणून शरद पवारांचा उपराष्ट्रपतीपदासाठी राधाकृष्णन यांना पाठिंब्यास नकार