विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pankaja Munde भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. लग्नानंतर अवघ्या नऊ महिन्यात हा प्रकार घडला.Pankaja Munde
शनिवारी रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. अनंत गर्जे यांचे याच वर्षात लग्न झाले होते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच पत्नीने आत्महत्या केली आहे. दरम्यान, या आत्महत्येनंतर मुलीच्या घरच्यांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला आहे. मुलीच्या घरच्यांनी वरळी पोलिस ठाण्यात धाव घेतली असून आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या करण्यात आली असा आरोप कुटुंबियांनी पोलिसांसमोर केला आहे तसेच कारवाई करण्याची मागणी केली आहे.Pankaja Munde
अनंत गर्जे यांचा विवाह 7 फेब्रुवारीला झाला होता. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाली असावी असा अंदाज आहे. या प्रकरणी वरळी पोलिसानी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. वरळीतील बीडीडी येथे ते राहात होते, गर्जे यांच्या पत्नी केईएम रुग्णालय डेंटिस्ट विभागात कार्यरत होत्या.
या घटनेनंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती मिळत आहे. अनंत गर्जे हे पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक वर्षांपासून स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहतात.
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्की काय घडले हे स्पष्ट होईल. सध्या तर याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.
Pankaja Munde’s personal assistant’s wife commits suicide, family alleges murder
महत्वाच्या बातम्या
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीची धडक बसून नवरा–बायकोसह दोन लहान मुलांचा अपघात
- Uddhav Thackeray : भाजप व संघाकडून मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष, उद्धव ठाकरे यांचा आरोप
- Smriti Mandhana : स्मृती मानधना लग्नाच्या तयारीत; सांगलीत सुरू लगबग, टीममेट्सचा व्हायरल डान्स
- Shiv Sena Shinde : शिवसेना शिंदे गटातील किमान 35 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार, ठाकरे गटाचा दावा



















