विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशात अनेक वकील आहेत. ते वेगवेगळ्या पक्षात आहेत. त्यांचं राजकारण होत नाही. परंतु उज्वल निकम यांच्या नियुक्तीत राजकारण करणे कुठेतरी गुन्हेगारांना मदत करण्यासारखं आहे, अशी खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना वकील नेमावे असा माझा प्रयत्न आहे. मात्र त्यांनी मला बोलताना सांगितलं की विनाकारण मला नेमल्यानंतर काही लोकं राजकारण करतात. त्यामुळे मला योग्य वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, तपास यंत्रणांना आपण नीट तपास करू दिला पाहिजे. सगळ्या गोष्टी तपास यंत्रणा रोज बाहेर सांगू शकत नाहीत. तपासात गोपनीयता ठेवूनच तपास केला जातो, त्यामुळे कुठल्याही प्रकारे तपास यंत्रणांवर दबाव न आणता त्यांना काम करू दिलं पाहिजे. मी निश्चितपणे सांगतो की कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही दोषी व्यक्तीला सोडलं जाणार नाही, तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहे
सैफ अली खान हल्ला प्रकरणावर ते म्हणाले, जी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्या पलीकडची माहिती आता तरी नाही. बरेच लोकं पोलिसांकडे आहेत. पोलीस काम करत आहेत. मला विश्वास आहे की पोलीस यासंदर्भात कारवाई पूर्ण करतील
Playing politics in Ujwal Nikam’s appointment is like helping criminals, Devendra Fadnavis said
महत्वाच्या बातम्या
- शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
- कुणाशी जरी लागेबांधे असले तरी आरोपीला सोडणार नाही, एकनाथ शिंदे यांची ग्वाही
- प्रजासत्ताकदिनी काँग्रेसची ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ रॅली
- सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तर तीन-चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुख्यमंत्र्यांची माहिती