विशेष प्रतिनिधी
मुंबई : गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे. पण हतबलता म्हणून मी शांत बसले. लोकप्रतिनिधी आपल्यावर चिखलफेक करतात तेव्हा बोलणं गरजेचं आहे. राजकारणात महिला कलाकरांना का खेचता असा सवाल प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केला आहे.
आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी तसेच यू ट्यूब चॅनलवरून सुरू असलेली बदनामी थांबावी या मागणीसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्राजक्ता बोलत होती. यावेळी प्राजक्ताच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. प्राजक्तानेही हात जोडून बदनामी करू नये अशी विनंती केली.
बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचा उल्लेख केला. “सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल, त्यांनी परळीला यावे. त्यांचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याचा प्रसार करावा”, असं सुरेश धस म्हणाले होते. यावर सूनवताना प्राजक्ता म्हणाली, बीडमध्ये पुरुष कलाकार गेले नाहीत का? तुम्हा महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाहीत तर कर्तुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. यातून तुमची मानसिकता दिसते, म्हणत प्राजक्तानं सुरेश धस यांना सुनावलं आहे. त्यांनी माझीच नाही तर इतर अभिनेत्रींचंही नाव घेतलं आहे त्यांचीही माफी मागावी.
प्राजक्ता म्हणाली, आपण का जमलोय हा विषय तुम्हाला माहीत आहे. बीड जिल्ह्यातील आमदार सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. काल नाही, दीड महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. दीड महिने मी शांतपणे सामोरे जात आहे. ट्रोलिंगला, निगेटिव्ह कमेंटला. शांतता ही माझी मूक संमती नाही. माझ्यासारख्या अनेक महिला आहेत, कलाकार यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुमच्यामुळे आमच्यावर बेतलं आहे.
एक व्यक्ती रागाच्या भरात उद्वेगाच्या भरात काही तरी बरळून जाते. त्या दोन वाक्याचा मीडिया हजारो व्हिडीओ करून जातो. तेवढेच शब्द पकडतो. त्यावरून युट्यूब चॅनलवर हजार व्हिडीओ बनतात. त्यावर सेलिब्रिटिला बोलणं भाग पाडलं जातं.मग ती व्यक्ती बोलते. मग दुसऱ्या व्यक्तीला वाटतं आपण बोललंच पाहिजे. मग ती बोलते. पुन्हा दुसरी व्यक्ती बोलते. आता नाही बोलली. का गप्प बसली. मग बोलणं क्रमप्राप्त होते. ही चिखल फेक सुरू राहते. महिलांची अब्रू निघत राहते. यांचं मनोरंजन होतं. हे होऊ नये. सर्व समाज माध्यमांसमोर चिखलफेक होऊ नये म्हणून मी यात पडले नाही. या गटारात दगड टाकणं योग्य वाटलं नाही” असं प्राजक्ता माळी यांनी सांगितलं.
प्राजक्ता म्हणाली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस यांच्याकडे माझी मागणी आहे की जर अशा प्रकारे कोणाची बदनामी होत असेल तर त्या यू ट्यूब चॅनलवर कारवाई करावी.
Prajakta Mali backlashed on Suresh Dhas with folded hands
महत्वाच्या बातम्या
- Election Commission : काँग्रेसचा रडीचा डाव, निवडणूक आयोगाने केली बोलती बंद
- संतोष देशमुख हत्येमागील मास्टरमाईंडवर कारवाई व्हावी, बाळासाहेब थोरात यांची मागणी
- जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी 3 कोटींच्या वाहनांची खरेदी; माजी महापौरांनी थाटबाटावरून केली टीका
- विनोद कांबळी यांना ३० लाख रुपयांची मदत, प्रताप सरनाईक यांची माहिती