विशेष प्रतिनिधी
पुणे : Prakash Ambedkar पोलिसांनी वस्तीत जाऊन लाठीचार्ज केला आहे. सव्वा महिन्याच्या मुलाच्या आईला घरात पोलिसांनी मारहाण केली आहे. हा सर्व उद्रेक आहे. यातून नवीन गोध्रा घडवण्याचं षड्यंत्र आहे. लोकांनी आता सावध राहील पाहिजे. भडकवणारे अनेक येतील, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. Prakash Ambedkar
पुण्यात पत्रकारांशी बोलताना आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने 1 कोटी रुपये देण्यात यावे आणि शासकीय नोकरीत कुटुंबातील एका व्यक्तीला सामावून घ्यावं, अशी मागणी केली. ज्याला घरात जाऊन मारहाण करण्यात आली. पाय तुटले आहेत. त्यांना 25 लाख रुपये द्यावेत आणि ते पैसे पोलिसांकडून वसूल करावेत. तरच अशा गोष्टींवर नियंत्रण येईल, असेही ते म्हणाले,भाजपने दंगल नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला नाही असा आरोप करून. आंबेडकर म्हणाले दलीत वर्ग केवळ मतपेटीसाठी हवाय. त्याच्या सुखदुःखात सहभागी होत नाहीत. Prakash Ambedkar
गोधरसारखे प्रकरण होऊ नये म्हणून सरकार ने लवकरात लवकर जाग व्हावं. पवार नावाच्या व्यक्तीला माथेफिरू अस जाहीर केलं. त्यांच्या गावातील माणूस परभणीत होता. पवार हा व्यक्ती माथेफिरु नाही. तो व्यवस्थित आहे. त्याच कुटुंब आहे, अस म्हणणं आहे. नांदेड येथील ज्या डॉक्टरांनी माथेफिरू अस घोषित केलं आहे. त्या डॉक्टरची चौकशी झाली पाहिजे.
पोलिसच गाड्या फोडत होते. सरकार च नियंत्रण नाही, असा आरोप करून आंबेडकर म्हणाले, सूर्यवंशी हे शहिद झाले. एलेलबी करायला आले होते. शांततेत बसले होते, वाचत बसलेले असताना त्यांना पोलिसांनी उचलून नेलं. शवविच्छेदन अहवालात मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
प्रशासनाला हे सर्व काबूत आणायचं असत तर त्यांनी आणलं असत. संविधानाची कॉपी उखडून टाकण्यात आली. यावर सरकार नियंत्रणात आणू शकलं असत पण त्यांनी नियंत्रण आणलं नाही.2004 मध्ये जी गोदरा घटना झाली. धर्म आणि द्वेष या गोष्टी पेरण्यात आल्या आहेत. यामुळं काहीही होऊ शकतं. अशी परिस्थिती आहे.
दोन मराठ्याच्या भांडणात सामान्य जनता भरडली जातेय. सूर्यवंशी यांना लक्ष का केलं गेलं? यावर पोलिसांनी शोधावे? परभणीतील राहिवाश्यांनी बंद ला पाठिंबा दिला. घडलेल्या घटनेविषयी खंत आहे. दंगली मागील मोरक्या कोण आहे हे सरकार शोधू शकत.
जो लाठीचार्ज केला, त्यातील काही विधान होती. त्यात द्वेष होता. आमच्या जमिनी खाल्ल्या ही मनुवाद्यांची भाषा आहे. हे सरकार ने शोधलं पाहिजे.