विशेष प्रतिनिधी
मुंबई : Devendra Fadanvis सिरियल किलर असतात त्याप्रमाणे राहुल गांधी सिरियल लायर आहेत. त्यामुळे ते तेच खोटे रोज बोलतील. तसेच परत-परत तिच खोटी आकडेवारी मांडतील. याविषयी माझ्या मनात शंका नाही. मात्र जनतेसमोर आज सत्य स्पष्ट झाले असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.Devendra Fadanvis
महाराष्ट्रातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदार संख्येतील फरकाबाबत मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अखेर लोकनीती-CSDS या नामांकित सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. मतदार संख्या तुलना करताना संस्थेकडून गंभीर घोडचूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, याची कबुली संस्थेचे सह-संचालक संजय कुमार यांनी स्वतः दिली आहे. त्यासाठी त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, आता राहुल गांधी माफी मागतील का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.Devendra Fadanvis
या संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकनीती-CSDS या सर्वेक्षण संस्थेने माघार घेतली आहे. त्यांनी जो डेटा दिला होता आणि ज्या डेटा वर आधारित इलेक्शन कमिशनवर राहुल गांधी यांनी आरोप केले होते. तसेच आमच्या सरकारला देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्याच आज लोकनीती-CSDS ने या संदर्भात ट्वीट करून आमचे आकडे चुकीचे होते म्हणत माफी मागितली आहे. तसेच त्यांनी त्यांचे आकडे परत घेतले आहे.Devendra Fadanvis
आता लोकनीती-CSDS च्या आकडेवारीवर अकांडतांडव करणारे राहुल गांधी माफी मागतील का? हा प्रश्न आहे. मात्र राहुल गांधी यांच्याकडून अशी मला अजिबात अपेक्षा नाही. राहुल गांधी एक प्रकारे ‘सिरियल लायर’ आहेत. ज्या प्रमाणे
सामाजिक आणि राजकीय शास्त्र क्षेत्रात काम करणारे लोकनीती-CSDSचे प्राध्यापक संजय कुमार यांनी महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात एक्स वर केलेली पोस्ट डिलीट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी महाराष्ट्र विधानसभा जागांमधील मतांच्या संख्येत घट झाल्याची माहिती दिली होती. एक्स वर ही पोस्ट डिलीट केल्यानंतर संजय कुमार यांनी माफीही मागितली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या टीमने डेटाचा चुकीचा अर्थ लावला होता. त्यांनी हे ट्विट 17 ऑगस्ट रोजी केले होते. भाजपने संजय कुमार यांच्यावर पोस्ट डिलीट केल्याबद्दल टीका केली आहे आणि म्हटले आहे की ही तीच संस्था आहे ज्यावर राहुल गांधी विश्वास ठेवतात
Rahul Gandhi is a serial liar, says Chief Minister Devendra Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला