Sanjay Raut : राहुल गांधींच्या बॉम्बमुळे भाजपवर तोंड लपवण्याची वेळ, संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut : राहुल गांधींच्या बॉम्बमुळे भाजपवर तोंड लपवण्याची वेळ, संजय राऊत यांची टीका

Sanjay Raut

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut  राहुल गांधींनी टाकलेल्या बॉम्बमुळे यांच्या अब्रूच्या चिंधड्या उडाल्या आहेत, हे कसले खुलासे करत आहे, जे झाले ते स्पष्ट आहे,50 मतदारसंघात भाजपचे उमेदवार कसे विजयी झाले हे राहुल गांधींनी काल पुराव्यासह दाखवले आहे, लोकशाहीमध्ये तोंड लपवण्याची वेळ भाजपवर आली आहे, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.Sanjay Raut

पत्रकार परिषदेत बोलताना, राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी युती आहे. हा इंडिया आघाडीचा विषय नाही. तो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय आहे. या निवडणुकीची राष्ट्रीय स्तरावर कधी चर्चा होत नाही, मग समोर महायुती असो की एनडीए. काही लोकांचे पक्षप्रमुख दिल्लीत असल्याने ते दिल्लीत जाऊन चर्चा करत असतील पण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा विषयाचा आणि आघाडीचा काही संबंध आणि आक्षेप नाही.

राऊत म्हणाले की, मराठीच्या प्रश्नावर महाराष्ट्र काँग्रेसची आणि आमची भूमिका एकच आहे. राजकीय दृष्टीने ठाकरे बंधू एकत्र आले याचा केंद्र बिंदू मराठी हाच आहे. शरद पवार असोत की हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका एकच आहे. आमच्यामध्ये मतभेद नाही. मुंबई वाचवण्यासाठी जर ठाकरे बंधूंनी घेतलेली भूमिका ही मराठी माणसांसाठी आनंदाची आहे. मनसेने परप्रांतीयांविरोधात भूमिका घेतलेली नाही.कधी काळी आमच्या विरोधातही हे आरोप होत होते. बंगालमध्ये तिथल्या भाषेसाठी आंदोलन सुरू आहे. तामिळनाडू मध्येही हे आंदोलन सुरू आहे तुम्ही महाराष्ट्रा वरच का आक्षेप घेत आहात? मराठी बोलणार नाही हे सांगितले की लोकांचा भडका उठतो.

, मविआ ही विधानसभा तर इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीसाठी तयार करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी आघाडी तयार झालेली नाही.प्रत्येक मनपा, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक आघाड्या निर्माण केल्या जातात त्यात कधी-कधी राजकीय पक्षही नसतात. त्यामुळे ह्या निवडणुकीचे अधिकार स्थानिक पदाधिकाऱ्यांना असतात. मुंबईचा निर्णय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी यांनी आमंत्रण दिल्यानुसार उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आले होते. राहुल गांधी यांचे प्रेझेंटेशन दुपारीच झाले होते मात्र आदित्य ठाकरेंनी केलेल्या विनंतीनंतर त्यांनी पुन्हा प्रेझेंटेशन केले. प्रेझेंटेशन उत्तम दिसत होते तिथे शेवटच्या रांगेत बसून आम्ही ते पाहिले, असा खुलासाही राऊत यांनी केला.

राऊत म्हणाले की, प्रेझेंटेशन झाल्यानंतर रश्मी ठाकरे, सोनिया गांधी, कमल हसन, खर्गे हे सर्व एका टेबलवर होते. मी आणि आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांच्यासोबत बसून स्नेहभोजन केले. यानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह आम्ही राहुल गांधींसोबत महाराष्ट्रातील राज कारणासह अनेक प्रमुख विषयावर चर्चा केली. काही घडामोडी देशामध्ये घडू शकतील हे आम्ही त्याच अनुषंगाने बोलत आहोत.

Rahul Gandhi’s Bomb Leaves BJP Red-Faced, Says Sanjay Raut

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023