विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्य युतीबाबत काॅंग्रेसकडून संमिश्र प्रतिसाद येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आतापर्यंत काॅंग्रेसवर विखारी टीका केलेली आहे. त्यामुळे ठाकरे गट – मनसे युती झाल्यावर महाविकास आघाडीचे भवितव्य काय असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीच काॅंग्रेसला साेबत घेण्याची इच्छा असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
अनेक वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक हे दोन्ही नेते एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. राज ठाकरे महाविकास आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवतील का, यावरही चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता राज ठाकरे काँग्रेसला सोबत घेऊन निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं आहे.कर्नाटकात ‘RSS’वर बंदी घालण्याची तयारी? मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाचे पत्र बनले कारणखासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत हा मोठा गौप्यस्फोट केला. ‘महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला सुद्धा सोबत घेणे, अशी स्वत: राज ठाकरेंची इच्छा आहे. ही त्यांची भूमिका आहे. पण याचा अर्थ हा निर्णय नाही. कारण प्रत्येकाचे या राज्यात स्थान आहे. शिवसेनेचे आहे, डाव्या पक्षाचे स्थान आहे, तसेच काँग्रेसचेही स्थान आहे, असे विधान खासदार राऊतांनी केले. या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत\”महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष येणार असेल तर एकत्र बसून चर्चा करावी लागेल असे माझे म्हणणे आहे आणि काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे. त्यांचे निर्णय दिल्लीत घेतले जातात. महाराष्ट्रातील सरकारमधील जे दोन पक्ष आहेत तेही त्यांचा निर्णय दिल्लीत घेतात. उद्याच्या शिष्ठमंडळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सामील होणार आहेत, असेही खासदार राऊत म्हणाले.
Raj Thackeray himself says, take Congress to task: Sanjay Raut claims
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना