विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात राज ठाकरे यांना बोलावण्याची शक्यता सचिन अहिर यांनी व्यक्त केली होती. मात्र दोघांचे पक्ष वेगळे असल्याने मेळाव्यात राज ठाकरेंना बोलावण्यास खासदार संजय राऊत यांनी नकार दिला आहे.
दसरा मेळाव्याला तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कदाचित राज ठाकरे यांना आमच्या पक्षाकडून दसरा मेळाव्याचे निमंत्रण दिले जाऊ शकते, असे विधान शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी केले होते. यासंदर्भात संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, दसरा मेळावा एकत्र होणार की नाही याबद्दल माहिती नाही. पण मी खात्रीपूर्वक सांगतो की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात उत्तम संवाद सुरू आहे. परंतु दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो आणि राज ठाकरेंचा गुढीपाडव्याचा मेळावा वेगळा असतो. असे असले तरी आमची विचारसरणी मराठी माणसांसाठी एक आहे. परंतु दोन्ही पक्ष वेगळे आहेत. त्यामुळे तसं होणं शक्य नाही.
संजय राऊत म्हणाले की, दोन्ही पक्षाचे मेळावे वेगळे होतात. मात्र भविष्यामध्ये काम करण्यासाठी एकत्र येण्यावर आमची सहमती झाली आहे. तसेच या सगळ्या चर्चांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंध सुधारले आहेत. याशिवाय दोन्ही पक्ष एकत्र येऊन काम करण्यासाठी सकारात्मक आहेत. साठ वर्षांपेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा आहे, असे सांगत संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता फेटाळली आहे.
Raj–Uddhav Thackeray Not Uniting for Dussehra Rally, Says Sanjay Raut: “Both Parties Are Separate
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा