विशेष प्रतिनिधी
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्यभर निषेध मोर्चा काढत गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे. यावेळी ठाण्यातील बदलापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पवार गटाचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी तर गोपीचंद पडळकर यांची जीभ छाटून आणणाऱ्याला 5 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे म्हणत थेट इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासंदर्भात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान केले. आई बडलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. देशमुख यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला. ते म्हणाले की, “गोपीचंद पडळकरची जो जीभ छाटून आणेल, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (शरद पवार गट) माध्यमातून त्याला पाच लाखांचे बक्षीस देण्यात येईल. आमची ही संस्कृती नाही, पण आता मात्र हद्द झाली आहे. आम्ही सहनशीलतेचा अंत बघणारे नाहीत, आजपासून आम्ही जशास तसे उत्तर देणार आहोत.” असे त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे आता अविनाश देशमुख यांच्या या विधानाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे सांगलीत तिसऱ्या दिवशीही पडसाद उमटले. सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बंदची हाक देण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. इस्लामपूर मतदारसंघातील विरोधकांसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अशा वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी पडळकरांच्या फोटोला पायाने तुडवण्यात आले होते. कोल्हापुरातही पक्षाचे जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पडळकरांविरोधात कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात आंदोलन करण्यात आले.
Reward of Rs 5 lakhs for the one who cuts off Padalkar’s tongue, direct warning from the general secretary of the Pawar group
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा