विशेष प्रतिनिधी
Mumbai News: महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत. महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केला आहे. पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत, असेही खडसे म्हणाल्या.
पुण्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका होत आहे. महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाच्या रूपाली पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये चाकणकर यांच्या एका समर्थक महिलेने एका सामान्य महिलेला फोन करून धमकावल्याचा आरोप होत आहे. ही क्लिप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण मयूरी हगवणे या थोरल्या सुनेने आधीच हगवणे कुटुंबाची तक्रार आयोगाकडे केली होती. परंतु दाखल घेण्यात आली नव्हती. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी स्पष्ट मत मांडले आहे. मयूरी हगवणे (जगताप) यांची दाखल घेतली गेली असती तर आज वैष्णवी जीवंत राहिली असती, असे रूपाली ठोंबरे यांनी म्हटले आहे. Rohini Khadse
आता पद जातंय या भीतीने प्रचंड खळबळ उडाली आहे… त्यामुळे अध्यक्षा आता या पातळीवर येऊन पोहोचल्या आहेत…
महिला आयोग अध्यक्षांविरोधात सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून कार्यकर्त्यांना धमकवण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहे
महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही ?… pic.twitter.com/wOMN2K1xbL
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 25, 2025
Rohini Khadse accuses Rupali Chakankar of threatening activists
महत्वाच्या बातम्या