विशेष प्रतिनिधी
मुंबई: Maratha community मराठा आंदोलन मनोज जरांगे यांचे आंदोलन शेवटच्या टप्प्यात आले असताना ओबीसी संघटनांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नका. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा ज्योतीबा फुले समता परिषदेमार्फत देण्यात आला आहे.Maratha community
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ४-५ दिवसांपासून मुंबई येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनामध्ये आंदोलनकर्ते इतर मागसवर्ग कोट्यातून आरक्षणाची मागणी करत आहेत. वास्तविक मराठा समाजाला सद्यस्थितीमध्ये खुल्या गटातून, SEBC, EBWS आणि कुणबी म्हणून (OBC) तून आरक्षण दिले जात आहे. तसेच त्याचा लाभ मराठा समाज घेत आहे. मात्र, आंदोलनकर्त्यांची मागणी इतर मागासवर्ग (OBC) कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी आहे.Maratha community
ओबीसी समाजामध्ये अतिशय अल्प आरक्षणाच्या कोट्यामध्ये ३७४ जातींना आरक्षणाचा लाभ मिळतो, असे असताना जर मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसी समाजातील जात बांधवांना आरक्षण हे नावापुरते शिल्लक राहील. ज्या समाजाने समाजव्यवस्थेमध्ये वर्षानुवर्ष-पिढ्यान पिढ्या समाजिक व आर्थिक मागसलेपण भोगले आहे. त्यावर अन्याय होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच मराठा समाजाला कुठल्याही परिस्थितीत ओबीसीतून आरक्षण देऊ नये. अन्यथा अखिल भारतीय महात्मा ज्योतीबा फुले समता परिषदेमार्फत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, शहराध्यक्ष कविता कर्डक, महिला शहराध्यक्ष आशा भंदुरे, रूपाली पठारे, सचिन जगझाप, अमोल नाईक, भालचंद्र भुजबळ, संदीप गांगुर्डे, संतोष पुंड, शंकर मोकळ, नाना पवार, स्वप्निल कासार, भरत जाधव, वाजाद शेख, राहुल घोडे, सुजाता खैरनार, प्रकाश महाजन, शरद मंडलिक, पोपट शिंदे, कुणाल बागडे यांच्यासह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी व ओबीसी समाजातील बांधव उपस्थित होते.
Samata Parishad warns of strong protests if Maratha community is given reservation from OBC
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल