विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि त्यांचे पुत्र गृह राज्य मंत्री याेगेश कदम यांची उध्दव ठाकरे यांच्या विराेधात कडवी भूमिका आहे. त्यामुळे दाेन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात या सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर याेगेश कदम यांनी ‘ शिरसाट यांच्या मताला काय महत्व? असा सवाल केला आहे. त्यामुळे शिंदे गटातीलच दाेन मंत्र्यात जुंपली आहे.
संजय शिरसाट यांनी शिवसेना (शिंदे) आणि शिवसेना (ठाकरे) या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या संदर्भात एक विधान केलं. त्यांच्या विधानानंतर महायुतीत खळबळ उडाली. यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षाच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे मंत्री योगेश कदम यांनी संजय शिरसाट यांना शालजाेडीतील देत संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत काही महत्त्व नाही, असे विधान केले.
कदम म्हणाले, “शिवसेना (शिंदे) पक्षाची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठरवत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उठाव केला तेव्हा आम्ही सर्व अधिकार मग त्यामध्ये पक्षाचे आणि निर्णयाचे सर्व अधिकार फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच दिलेले आहेत. ते अधिकार दुसरे कोणालाही नाहीत. त्यामुळे मंत्री संजय शिरसाट हे काय म्हणतात त्याला महायुतीमध्ये काही महत्व नाही. कारण ते त्यांचं वैयक्तिक मत आहे.
संजय शिरसाट यांनी शिवसेनेतील फुटीबाबत आपल्याला यातना हाेतात. दाेन्ही गटाच्या नेत्यांचे एकमेंकांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे दाेन्ही गट एकत्र येऊ शकतात, असे विधान केले हाेते. मात्र, त्यानंतर लगेचच त्यांनी या विधानावरून पलटी मारली हाेती. उध्दव ठाकरे यांनी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीसाेबत युती केल्याने आम्ही नाराज झालाे हाेताे. आता दाेन्ही गट एकत्र येणे अवघड असल्याचेही ते म्हणाले हाेते.
Sanjay Shirsat opinion, Yogesh Kadam question
महत्वाच्या बातम्या
- Nirmala Sitharaman’ : कॅन्सरवरील औषधे, टीव्ही, मोबाईल आणि इलेक्ट्रिक कार होणार स्वस्त
- Modi Govt : मोदी सरकारची मध्यमवर्गीयांना आजपर्यंतची सर्वात मोठी भेट, एक लोक कोटी तोटा सहन करून १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
- Devendra Fadnavis भारताच्या आर्थिक इतिहासातील मैलाचा दगड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अर्थसंकल्पाचे कौतुक