विशेष प्रतिनिधी
मुंबई: Sharad Pawar ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार काका पुतण्यांवर शाब्दिक हल्ल्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. शरद पवार हे दुतोंडी मांडुळ तर अजित पवार जातीवादी असल्याची बोचरी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.Sharad Pawar
ओबीसी समाजासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने मंडल यात्रा काढली आहे. यावर बोलताना शरद पवार यांनीच ओबीसींचे आरक्षण संपवले असा आरोप करताना हाके म्हणाले, ओबीसी मतदार दूर गेल्यामुळे शरद पवारांचा हा प्रकार सुरू आहे. शरद पवारांची भूमिका ओबीसींना आवडलेली नाही. शरद पवार हे दुतोंडी मांडुळासारखे वागतात. शरद पवार यांनीच महाराष्ट्र मधील ओबीसीचे आरक्षण संपवल आहे. त्यांनीच मनोज जरांगे यांना रसद पुरवली आहे. शरद पवार यांनी फुले, शाहू, आंबेडकरांचे’ नाव घेऊन ओबीसींचा आरक्षण बुडवले, असा आरोप त्यांनी केला.Sharad Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही हाके यांनी निशाणा साधला. अजित पवार हे जातीवादी नेते आहेत, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला. अजित पवार हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार,कारखानदार यांचे नेते असल्याचे असून ते जातीयवाद करतात. पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे. अजितदादा पवार यांचा महाज्योती संदर्भातील सामाजिक दुजाभाव मी वारंवार महाराष्ट्राला सांगितला आहे. अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाला न शोभणारे व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय काहीही माहित नाही. पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत असतं म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
खासदार सुप्रिया सुळे या केवळ वडिलांच्या मायलेज वर निवडून येतात. त्यांचं संसदेत काय काम आहे? म्हणून त्यांना आदर्श संसद रत्न पुरस्कार मिळतो. खासदार सुप्रिया सुळे यांनी समाजातल्या तळागाळातील लोकांचे प्रश्न कधी संसदेत मांडले आहेत का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी विचारला.
महाराष्ट्राला पुढील काळात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाला सामोरे जावे लागणार असल्याचा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला. ते म्हणाले, मनोज जरांगे या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. संविधानानुसार आरक्षण मिळतं. मात्र जरांगे मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटू पाहत आहेत.
Sharad Pawar Called a ‘Two-Faced Snake’, Ajit Pawar Branded ‘Casteist’ in Laxman Hake’s Stinging Attack
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला