विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sharad Pawar मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित लढावे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यक्त केली जात आहे.Sharad Pawar
महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे (ठाकरे) सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मधूर संबंध निर्माण झाले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्रित लढण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेनेचे (ठाकरे) सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत मधूर संबंध निर्माण झाले आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्रित लढण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे), मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) एकत्रित लढले तर मुंबई महापालिकेत जागा वाटपाचे सूत्र कसे असणार यावरच सध्या चर्चा अडल्याची माहिती आहे.
मुंबईमध्ये 2017 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. तेव्हा सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. निवडणुकीनंतर तत्कालिन एकत्रित शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली आणि त्यांनी मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. शिवसेना आणि भाजपमध्ये एवघ्या दोन जागांचा तेव्हा फरक होता. आता आठ वर्षानंतर राज्यातील राजकारणाचे संपूर्ण चित्र बदलले आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन-दोन गट झाले आहेत. तर, ठाकरे बंधू एकत्र येताना दिसत आहेत. अशावेळस भारतीय जनता पक्षाला मुंबई महापालिकेत रोखण्यासाठी विधानसभा आणि लोकसभेप्रमाणेच महाविकास आघाडीने एकत्रित लढावे आणि मनसेलाही सोबत घ्यावे असा विचार खासगीत मांडला जात आहे.
महाविकास आघाडीसोबत मनसे आल्यानंतर जागा वाटप कसे होणार, हाच कळीचा मुद्दा आहे. सर्वपक्ष स्वतंत्र लढल्यानंतर शिवसेनाला 84 वॉर्डमध्ये विजय मिळाला होता. आगामी निवडणुकीत शिवसेना 100 ते 110 जागांवर लढण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये विधानसभेचे 36 मतदारसंघ आहेत. त्यानुसार जागा वाटपाचा फॉर्म्युला लक्षात घेतला तर
एका मतदारंसघात महापालिकेचे साधारण 6 वॉर्ड अर्थात 6 नगरसेवक आहेत. त्यानुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला (ठाकरे)3 वॉर्ड मिळू शकतात. या सूत्रानुसार काँग्रेसला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 2 वॉर्ड, मनसेला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 2 किंवा 1 वॉर्ड तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला दोन विधानसभा मतदारसंघातून 1 वॉर्ड येण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मराठा समाज आणि मुस्लिम समाजाचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. जातीय समीकरण देखील जागा वाटपामध्ये महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसने स्वतंत्र लढून ३१ नगरसेवक निवडून आणले होते, त्यामुळे मुंबईतील दलित, मुस्लिम, ख्रिश्चन आणि उत्तर भारतीय मतदारांमध्ये त्यांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते.
मुंबईमधील 36 विधानसभा जागांपैकी शिवसेनेने (ठाकरे) विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक 22 जागा लढल्या आणि 10 जागांवर विजय मिळविला. काँग्रेसचे तीन आमदार आहेत. तर शरद पवार आणि राज ठाकरे यांचा एकही आमदार नाही.
भाजपला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीची स्थापना झाली आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीतही महाविकास आघाडीने एकत्रित लढावे अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) कार्यकर्त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर भावना व्यक्त केली, असे पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र असली पाहिजे, अशी शरद पवारांची भूमिका असल्याचे आव्हाड म्हणाले. ते म्हणाले की, मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रातील महानगरपालिकांची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे भाजपला पराभूत करण्यासाठी सर्वांनी एकत्रित निवडणूक लढावी, अशी शरद पवार यांची भूमिका आहे.
Sharad Pawar Urges Maha Vikas Aghadi to Contest United
महत्वाच्या बातम्या
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीची धडक बसून नवरा–बायकोसह दोन लहान मुलांचा अपघात
- Uddhav Thackeray : भाजप व संघाकडून मुंबईत भाषिक प्रांतवादाचे विष, उद्धव ठाकरे यांचा आरोप
- Smriti Mandhana : स्मृती मानधना लग्नाच्या तयारीत; सांगलीत सुरू लगबग, टीममेट्सचा व्हायरल डान्स
- Shiv Sena Shinde : शिवसेना शिंदे गटातील किमान 35 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार, ठाकरे गटाचा दावा



















