विशेष प्रतिनिधी
नंदूरबार : माझ्या टार्गेटवर दोन जण आहेत. एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरे आमश्या पाडवी यांना जास्त मस्ती आलीय, ती जिरवायची आहे, असा इशारा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजयकुमार गावित यांनी दिला आहे. यामुळे महायुतीतील मतभेद समोर आले आहेत.
आमदार आमश्या पाडवी यांच्याबाबत गंभीर आरोप करताना विजयकुमार गावित म्हणाले की,आमदार आमश्या पाडवी यांच्या नावावर १२ फ्लॅट आहेत, पत्नीच्या नावे ४ बंगले आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून आणि राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ घेतले आहेत. शिंदेचे आमदार युतीत राहून नेहमी विरोध करतात. मी आता त्यांना जागा दाखवणार आहे. त्यांना सोडणार नाही.
याआधी भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच अशी टीका केली होती. भंडारा येथील स्थानिक निवडणुकीत भाजपा-शिंदेसेनेतील वाद उफाळून आला. फुके यांच्यावर शिंदेसेनेने आरोप केला होता. त्यानंतर फुके यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. माझ्यावर अनेक लोक आरोप करतात. मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही.
जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचं कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले. याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापावर केला जातो. त्यामुळे मला पक्कं माहिती झालं, शिवसेनेचा बाप मीच आहे. खापर माझ्यावर फोडले जाते असं त्यांनी विधान केले होते. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनी शिंदे आमदारांवर कठोर टीका केली आहे.जालन्यातही भाजपा-शिंदेसेनेत जुंपली.
Shinde’s MLA needs to be teach lessons, warns Vijaykumar Gavit
महत्वाच्या बातम्या
- Dnyaneshwari Munde : महादेव मुंडे यांना ओळखत नव्हता तर पोलिसांना का कॉल केले? ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल
- Uddhav Thackeray हिंदूंना बदनाम करण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचा सवाल
- सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही…चीनबाबत आरोपांवरून सुप्रीम कोर्टानेच उपटले राहुल गांधींचे कान
- कोथरूड प्रकरणात पोलिसांवर कारवाई नाही; ती ओबीसी पीडित कोण ? रोहित पवारांचा पुणे पोलिसांना सवाल!