विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut on Ajit Pawar : राज्यात जर नैतिकतेचा विचार केला आणि ती पाळायची ठरवली तर राज्यातील 90 टक्के मंत्रिमंडळ रिक्त होईल. शिंदे गटातले सर्व मंत्री घरी बसतील. अजित पवारांसह अर्धे मंत्री घरी जातील. प्रत्येकावर आरोप आणि गुन्हे आहेत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला.
अर्थी त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना फोन केला म्हणजे ते त्यांचीच माणसं आहेत. अजित पवार नेहमी सांगतात मी नियमबाह्य काम करत नाही. चुकीचे काम करणाऱ्यांना पोलिसांनी फटके द्यावे असे बारामतीमध्ये सांगतात. ते इतक्या वेळा उपमुख्यमंत्री राहिले त्यांना फोनवर कोण काय काम सांगते हे कळू नये? पोलिसांशी ते वाद घालत होते याला तणाव म्हणत नाही. यासाठी अजित पवार नाही तर अर्धे मंत्रिमंडळ या कामांना संरक्षण देत आहे. त्यांना गुन्हेगार ठरवत नाही पण अजित पवारांनी नाकाने कांदे सोलू नयेत.
कायदा अन् सुव्यवस्था राखणे म्हणजे आयपीएस अधिकाऱ्यांना धमकावणे असते ही व्याख्या तयार झाली आहे का? एक महिला आयपीएस अधिकारी अवैध काम थांबवत आहे, त्याच गुंडाच्या मोबाईलवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री महिला अधिकाऱ्याला घाबरवतात ही कोणती कायदा अन् सुव्यवस्थेची व्याख्या आहे. अजित पवार यांच्या पक्षातील गुंड अवैध कामे करत आहेत त्यांना सुरक्षा देण्याकरता आयपीएस महिला अधिकाऱ्यांना आदेश दिला त्यांनी तो मानला नाही तर त्यांना धमकावले. नैतिकतेच्या आधारे त्यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे. जेव्हापासून देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सत्तेत आले आहेत तेव्हापासून नैतिकता संपली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हणाले की, संजय शिरसाट यांच्या काळात झालेला जमीन घोटाळ्याचा मुद्दा संपलेला नाही. गणेशोत्सवामुळे आम्ही 10 ते 12 दिवस शांत होतो. 5 हजार कोटीची जमीन एका व्यक्तीला दान देण्यात आली ज्यांचा आणि जमिनीचा काहीही संबंध नसताना. तरीसुद्धा मुख्यमंत्री शांत बसले आहेत, पण आता जनता शांत बसणार नाही.
संजय राऊत म्हणाले की, महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना पहिली धमकी अजित पवारांनी दिली तर दुसरी धमकी त्यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. त्यांनी पत्र लिहून तुम्हाला राज्यात काम करु देणार नाही असे दाखवण्याचे काम केले. त्या महिला अधिकाऱ्यांचे काय चुकले. तुम्ही मला माझ्या मोबाईलवर कॉल करत बोला म्हटले तर महिला अधिकारी कुठे चुकल्या?
So half of the ministers including Ajit Pawar will go home, says Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा