विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray महापालिकेसाठी ठाकरे गट – मनसे युतीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्यासाठी शिवतीर्थावर गेले होते.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र हे दोन्ही जीआर रद्द झाल्यानंतर विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षांनंतर मातोश्रीवर गेले होते. या भेटीनंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गणपती दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब गेले होते. उद्धव ठाकरे आज (10 सप्टेंबर) पुन्हा शिवतीर्थवर आपल्या नेत्यांसह राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.
काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येताना दिसत आहेत. हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्राला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह विरोधकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारला यासदर्भातील दोन्ही जीआर रद्द करावे लागले होते. यानंतर 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनी एकाच मंचावर एकत्र आले होते. त्यानंतर 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. त्यानंतर गणेश चतुर्थीच्या दिवशी दोन्ही ठाकरे बंधूंचे कुटुंब एकत्र आले होते.
दरम्यान, आज खासदार संजय राऊत आणि आमदार अनिल परब यांच्यासोबत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. या भेटीसंदर्भात अधिक माहिती समोर आली नसली, दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या दीड तास चर्चा झाली. ठाकरे बंधूंमध्ये आगामी मुंबई महापालिकेतील युतीची चर्चा, मुंबईसह स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका, दसरा मेळाव्याचे आमंत्रण देणे आणि मविआमध्ये मनसेच्या समावेशाच्या विषयासंदर्भात ही भेट असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Thackeray group moves for MNS alliance for Municipal Corporation, Uddhav Thackeray on Shiv Tirtha to meet Raj Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा