विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhananjay Munde लहान मुलीची शाळा याच भागात असून विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. मात्र याच परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणं सध्या कठीण आहे. त्यामुळे शासकीय बंगला सोडला नसल्याचे स्पष्टीकरण माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.Dhananjay Munde
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन चार महिने झाले आहे, मात्र अद्यापही त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. याप्रकरणी धनंजय मुंडे यांना दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे शासकीय निवासस्थान कधी सोडतात? आणि दंड भरतात का? असा प्रश्न काही दिवसांपूर्वी उपस्थित झाला होता. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत आपले कुठेही घर नसल्याने शासकीय निवासस्थान सोडत नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते. मात्र धनंजय मुंडे यांचा मुंबईत कोट्यावधींचा फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Dhananjay Munde
माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे म्हणाले की, मुंबई शहरातील सातपुडा हे शासकीय निवासस्थान मी रिक्त केले नसल्याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. पण मुंबईतील माझी सदनिका सध्या राहण्यासाठी योग्य नसून त्याठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू आहे. शिवाय माझ्या लहान मुलीची शाळा याच भागात असून माझ्या विविध आजारांवरील उपचारार्थ देखील मला मुंबईत राहणं गरजेचं आहे. मात्र याच परिसरात तातडीने भाड्याने घर मिळणं सध्या कठीण आहे. माझा शोध सुरू असून माझ्या सदनिकेचं काम पूर्ण होताच मी शासकीय निवासस्थान रिक्त करणार असल्याबाबत शासनाकडे तशी विनंती केली आहे, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. मात्र दंड भरण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी काहीही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे ते शासकीय निवासस्थान सोडताना दंड भरतात का? हे पाहावे लागेल.
दरम्यान, शासकीय निवासस्थान न सोडल्याने धनंजय मुंडे यांना 42 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र मुंबईत हक्काचे घर नाही, असे सांगणाऱ्या मुंडेंचे 2024 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हाचे प्रतिज्ञापत्र समोर आले आहे. या प्रतिज्ञापत्रात मुंडेंनी त्यांचे गिरगाव चौपाटी येथील एन. एस. पाटकर मार्गावरील वीर भवन इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर एक अलिशान फ्लॅट असल्याचे नमूद केले होते. याबाबतची अधिक माहिती घेतली असता, मुंबईतील एका प्राइम लोकेशनवर असलेला हा फ्लॅट तब्बल दोन हजार एकशे एक्कावन्न चौरस फुटांचा आहे. या फ्लॅटची साधारणतः किंमत ही 16 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती आहे.
That’s why he didn’t leave the government bungalow, Dhananjay Munde couldn’t get a house on rent in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला