विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) राज्य सरकारने विविध उद्याोगसमूह आणि बड्या कंपन्यांशी सुमारे 16 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले.
आंतरराष्ट्रीय कंपन्यांसह देशभरातील कंपन्या राज्यात आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असून ‘इज ऑफ डुईंग बिझिनेस’मुळे कंपन्यांची महाराष्ट्राला अधिक पसंती आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात आर्थिक गुंतवणुकीचा ओघ वाढत असून रिलायन्स उद्याोगसमूहाने तीन लाख पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केले आहेत. त्यातून तीन लाख रोजगारनिर्मिती होणार आहे. ही गुंतवणूक पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, अपारंपरिक ऊर्जा, जैवऊर्जा, हरित हायड्रोजन, हरित रसायने, औद्याोगिक क्षेत्र विकास, किरकोळ व्यवसाय, डाटा सेंटर, दूरसंचार, आदरातिथ्य उद्याोग आणि बांधकाम क्षेत्रात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित नवभारत उभारणीच्या संकल्पनेला हातभार लावण्यासाठी रिलायन्स उद्याोगसमूह कटिबध्द असल्याचे कंपनीच्या ऊर्जा व्यवसायाचे प्रमुख अनंत अंबानी यांनी सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था पाच लाख कोटी डॉलर्सवर नेण्याचे उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरवर नेऊन हातभार लावण्याच्या फडणवीस यांच्या प्रयत्नांची अंबानी यांनी या वेळी प्रशंसा केली.
एनटीटी डाटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत दुबे यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. महाराष्ट्रात एक गिगावॅट क्षमता असलेली ‘एनटीटी’ कंपनी डाटा सेंटर उद्याोगात अग्रेसर असून उद्याोगवाढीतील संधींबाबत ही बैठक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल्सबर्ग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेकब अरुप अँडरसन यांच्याशी चर्चा केली असून, समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली आहे. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे मुख्य संचालक एमए युसुफ अली यांनी नागपूरमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. फडणवीस यांनी फिनलंडचे वाणिज्यमंत्री विले ताविओ यांची भेट घेऊन महाराष्ट्र-फिनलंडमधील व्यापारी संबंधांबाबत चर्चा केली. फिनलंडमध्ये ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र रोडशो’चे आयोजन करण्यात येणार असून हरित ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, रसायने, खते क्षेत्रात गुंतवणुकीबाबत उभयपक्षी सहकार्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.
The Chief Minister said, companies prefer Maharashtra due to ‘ease of doing business’
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणाच्या पलीकडचे, वाद लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उदय सामंत यांनी सुनावले
- Prime Minister : पंतप्रधानांची ‘मन की बात’, वाशीमचे ‘स्टार्ट अप’चे केंद्र म्हणून कौतुक
- Gulabrao Patil : झोपेत असाल त्यावेळी ठाकरे गटाचे १० आमदार कधीही इकडे येतील, गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरे यांना इशारा
- Rohit Pawar : रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे डोहाळे, म्हणाले शरद पवार भाकरी फिरविणार