विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिखट टीका केली आहे. ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते. काम करणाऱ्यांना पुढे न्यायचे आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवायचे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंच्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळाली नाही. कामगार नेते, शशांक राव यांच्या पॅनेलने २१ पैकी १४ जागांवर बाजी मारली आहे. तर, आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलला ७ जागा मिळाल्या आहेत.
ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल, असा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे, काम करणाऱ्यांना पुढे न्यायचे आणि घरी बसणाऱ्यांना घरी बसवायचे, हे महाराष्ट्रातील जनतेने ठरवलं आहे. लोकांना विकास आणि कल्याणकारी राज्य पाहिजे. काम करणारे लोक पाहिजेत. महाविकास आघाडीचे सरकार हे स्थगिती सरकार होते. हे स्पीडब्रेकर आम्ही काढून टाकले. हे समृद्धी सरकार राज्यात स्थापन झाले आहे.”
“विरोधक ईव्हीएमवर शंका घेतात. पण, ही निवडणूक बॅलेटवर झाली आहे. लोकसभा निवडणुका जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले असते, जेव्हा पराभव होतो, तेव्हा ईव्हीएम खराब असते, निवडणूक आयोगाला दोष दिला जातो. ही निवडणूक बॅलेटवर झाली आहे, मग आता काय आरोप करणार आहात? महायुतीने केलेल्या कामाची पोचपावती विधानसभेत जनतेने आम्हाला दिली. येणाऱ्या निवडणुकांत देखील जनता आम्हाला पोचपावती देईल,” असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
बेस्टच्या निवडणुकीबद्दल बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, “ब्रँडचा बँड वाजवण्याचे काम जनता करत असते. हे सगळे जनतेच्या हातात असते. त्यामुळे जनतेने ठरलेले आतापर्यंत झाले आहे. विधानसभेला आमचे ८० पैकी ६० आमदार निवडून आलेले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल.”
The people played the brand’s band, Eknath Shinde attacked the Thackeray brothers over the crushing defeat of BEST Patpedhi
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला