विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे, असा संताप राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. Supriya Sule
स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बुधवारी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रेय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. याबाबत सुळे म्हणाल्या, या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.
या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा सवाल करून सुळे म्हणाल्या, स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी आहे.
राज्यात खाकी वर्दीची भीती राहिली नाही का? जलदगती न्यायालयात सुनावणी घेऊन ठराविक कालावधीत एखाद्याला चौकात फाशी दिल्याशिवाय खाकीची जरब बसणार नाही, अशी मागणी सुळे यांनी केली.
आम्ही दिल्लीत असतो तेव्हा अभिमानाने सांगतो की आमचे पोलिस सगळ्यात चांगले आहे. मग असे प्रकार सातत्याने का होत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
सुळे म्हणाल्या
मला या प्रकरणात राजकारण करायचे नाही. सरकार कुणाचंही असो पण बलात्कार वगैरे अशा घटनांवेळी सगळेजण पीडितेसाठी ताकदीने उतरतात. पण प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी आम्हाला एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे की सगळेकडे कॅमेरे आहेत, पोलीस त्यावर नजर ठेवून आहेत. सगळ्यांकडे मोबाईल आहेत. पोलिसही मोबाईलमध्ये विविध ट्रॅक ठेवत असतात. एवढे सगळे असूनही अत्याचारांत सातत्याने वाढ कशी होत आहे? याचे आत्मचिंतन आपण समाज म्हणून केले पाहिजे. पुणे महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात असा एक दिवस जात नाही ज्यादिवशी एखादी क्राईमची घटना घडत नाही. बलात्कार, छेडछाड, चोरी, कोयता गँग… थांबतच नाही कुठे….
The plight of law and order in Pune, Supriya Sule’s anger over the Swargate rape incident
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Nirupam : एसआरए प्रकल्पांमध्ये हिंदू कमी करून हाऊसिंग जिहाद, संजय निरुपम यांचा आरोप
- धक्कापुरुष कायमचा घरी बसविला , एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- Raj Thackeray मराठी भाषा गौरव दिनी मनसेचे पुस्तक प्रदर्शन, राज ठाकरेही आवडीची कविता सादर करणार
- Sharad Pawar शरद पवार यांनी सांगितलं आपल्या पंतप्रधानपदाचा किस्सा, नाव शॉर्टलिस्ट पण…