Dahi Handi : मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान चिमुकला बालगोविंदाचा वरच्या थरावरुन पडून मृत्यू

Dahi Handi : मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान चिमुकला बालगोविंदाचा वरच्या थरावरुन पडून मृत्यू

Dahi Handi

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dahi Handi  अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दहीहंडीच्या सणाला मुंबईत गालबोट लागले आहे. सध्या मुंबईत गोविंद पथकांकडून दहीहंडीचा जोरदार सराव सुरु आहे. या सरावादरम्यान, मुंबईच्या पश्चिम उपनगरातील एका बालगोविंदाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.Dahi Handi

दहिसर पूर्वेला असणाऱ्या केतकीडपाडा परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये नवतरुण गोविंदा पथकाचा बालगोविंदा महेश रमेश जाधव (वय 11) याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, रविवारी रात्री अकरा वाजता दहिसरच्या केतकीपाडा परिसरात नवतरुण मंडळाकडून दहीहंडीचे थर रचण्याचा सराव सुरु होता. यावेळी या मंडळाचा बालगोविंदा महेश जाधव हा वरच्या थरावर चढला होता. तो वरच्या थरावर चढला असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. तो थेट जमिनीवर कोसळल्याने त्याला जबर मार लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात दहिसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन महेश जाधव याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. दहिसर पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, यामध्ये कोणाची चूक होती, त्याचा पाय सटकला की नेमके काय झाले, याचा तपास सध्या दहिसर पोलिसांकडून सुरु आहे.

येत्या 16 ऑगस्टला दहीहंडीचा सण होणार आहे. मुंबईतील दहीहंडी उत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. या उत्सवात मुंबईतील हजारो गोविंद पथकं सहभागी होत असतात. ही गोविंदा पथकं दिवसभर शहरभरात फिरुन विविध ठिकाणी मानाच्या हंड्या फोडत असतात. दहीहंडी फोडताना अनेक मंडळांकडून सात ते नऊ थर रचले जातात. हे थर रचताना अनेक गोविंदा जखमीही होतात. त्यादृष्टीने मुंबईतील प्रशासन तयार असते. राज्य सरकारने गोविंदा पथकांसाठी विमा योजनेची घोषणा केली होती. गोविंदा पथकांना या विम्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. मात्र, ही ऑनलाईन प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने मुंबईतील अनेक गोविंदा पथकांनी अजूनपर्यंत हा विमा काढलेला नाही.

Toddler Balgovinda dies after falling from upper tier during Dahi Handi practice in Mumbai

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023