विशेष प्रतिनिधी
मुंबई: Tanker Chaos मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटल्याने वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना त्यांच्या फास्टॅगमध्ये टोल परतावा दिला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आली आहे.Tanker Chaos
3 फेब्रुवारी रोजी द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाट सेक्शनमध्ये सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अडोशी बोगद्याजवळ गॅसने भरलेला एक टँकर उलटला होता. यामुळे 33 तास वाहतूक कोंडी झाली आणि अनेक किलोमीटरपर्यंत 1 लाखांहून अधिक वाहने अडकून पडली होती. वाहनचालकांना आणि प्रवाशांना पाणी, अन्न आणि इतर आवश्यक सुविधांच्या कमतरतेचा सामना करावा लागला होता.Tanker Chaos
टोल वसुली थांबवण्याचा आदेश जारी झाल्यानंतरही वाहन मालकांकडून वसूल केलेले संपूर्ण पैसे परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5.16 कोटी रुपयांचा परतावा MSRDC प्रक्रिया करेल.
गॅस गळतीनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी NDRF, SDRF आणि भारत पेट्रोलियम (BPCL) च्या टीम्स घटनास्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. पुणे येथून मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात आली होती.
परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आणण्यासाठी पुणे लेनमधून मुंबईकडे 15-20 मिनिटांच्या ब्लॉकमध्ये गाड्या जात होत्या.
Toll Refund for Motorists Hit by Tanker Chaos
महत्वाच्या बातम्या
- शक्तीपीठ महामार्ग विरोधातील आंदोलन तीव्र करणार, राजू शेट्टी यांचा इशारा
- Rahul Gandhi राहुल गांधी यांची भिवंडी न्यायालयात हजेरी; भाजपने ठाण्यात दाखवले काळे झेंडे
- Bhiwgan Case : भिगवण प्रकरणातील तरुणीची सुधार गृहात रवानगी
- Muslim Reservation : मुस्लिम समाजाच्या आरक्षण रद्द विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका