विशेष प्रतिनिधी
नागपूर : Jayashree Shelke केवळ ८४१ मतांनी पराभूत झालेल्या महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री शेळके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल करून बुलढाणा विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाची फेरमोजणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.या मतदारसंघामधून शिवसेना -एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार संजय गायकवाड हे विजयी झाले आहेत. त्यांना ९१ हजार ६६०, तर शेळके यांना ९० हजार ८१९ मते मिळाली.Jayashree Shelke
शेळके केवळ ८४१ मतांनी पराभूत झाल्या. त्यामुळे त्यांनी तेव्हाच मतमोजणीवर आक्षेप घेत म्हटले हाेते की, निवडणुकीत अनियमितता झाली. मतदार यादीमध्ये ३ हजार ५६१ बोगस मतदारांचा समावेश होता. अनेकांची नावे दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी होती. अनेक ठिकाणी मृत मतदारांच्या नावावर मतदान करण्यात आले. परिणामी, सर्व इव्हीएम न्यायालयात आणून न्यायालयासमक्ष फेरमोजणी करण्यात यावी.
शेळके यांनी गायकवाड यांच्याविरूद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. गायकवाड यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ अंतर्गत अर्ज दाखल करून ही निवडणूक याचिका फेटाळण्याची मागणी न्यायालयाला केली आहे. शेळके यांनी या अर्जालादेखील प्रत्युत्तर दिले आहे. गायकवाड यांचा अर्ज गुणवत्ताहीन व निराधार आहे. त्यामुळे निवडणूक याचिकेवर गुणवत्तेच्या आधारावर निर्णय देण्यात यावा, अशी विनंती शेळके यांनी न्यायालयाला केली आहे.
बुलढाणा मतदारसंघाची मतदारयादी, सर्व बुथवरील सीसीटीव्ही फुटेज, गायकवाड यांचे निवडणूक विजयाचे प्रमाणपत्र व इतर संबंधित कागदपत्र न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशीही मागणी शेळके यांनी केली आहे. त्याकरिता त्यांनी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे.
Troubles increase in Sanjay Gaikwad’s case: Jayashree Shelke, who lost by just 841 votes, demands a re-evaluation
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला