विशेष प्रतिनिधी
विरार : विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत एका बाजूला कोसळल्याने 15 जणांचा मृत्यू झाला. गणेशोत्सवाच्या आदल्या रात्री इमारत कोसळून झालेल्या या भयानक दुर्घटनेत संपुर्ण वसई विरार परिसर हादरला होता. विरार पूर्वच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा काही भाग कोसळला. virar building collapse news
वसई विरार महापालिकेने या इमारतीचे बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर मोठी कारवाई केली आहे. विरार पोलीस ठाण्यात बिल्डर नितल साने याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. नितल गोपीनाथ साने या बांधकाम व्यवसायीकाला विरार पोलिसांनी अटक ही केली. तसेच, सोबत जागा मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2008 ते 2009 मध्ये या दोघांनी ही चार मजली अनाधिकृत इमारत बांधली होती. या इमारतीमध्ये 54 फ्लॅट आणि चार गाळे होते. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 52, 53 आणि 54 नुसार गुन्हा दाखल केला असून BNS कलम 105 नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मंगळवारी मध्यरात्री वसई विरार महानगरपालिका हद्दीतील मौजे नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळला होता. इमारतीच्या मातीचा ढिगारा शेजारच्या चाळीवरही कोसळल्याने रहिवासी मलब्याखाली दबले गेले. त्यामुळे या घटनेची तीव्रता आणखी वाढली.
३० तासांपासून बचावकार्य सुरु असून एनडीआरएफच्या ५ व्या बटालियनच्या दोन तुकड्या, वसई-विरार महानगरपालिकेची तुकडी आणि स्थानिक पोलिस रात्रंदिवस मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले आहेत.विरारच्या विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट या इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीच्या ढिगाऱ्यात अनेक कुटुंब गाडली गेली. या अपार्टमेंटमध्ये ५० घरं आहेत. त्यापैकी १२ घरं कोसळली. तसेच इमारतीचा मलबा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली आणि मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. रा (२५) अशी मृतांची नावे आहेत.
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर रमाबाई अपार्टमेंट शेजारील ४ मजली इमारत व आजूबाजूच्या चाळी रिकाम्या करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी विरार पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नितल गोपीनाथ साने आणि या अपघातासाठी जबाबदार असलेल्या जमीन मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम ५२, ५३ आणि ५४ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १०५ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
virar building collapse news
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा