विशेष प्रतिनिधी
मुंबई : Vivek Agnihotri–Pallavi Joshi माझ्यासाठी वरण भात हा एकदम कल्चरल शॉक होता, इतके साधे जेवण! मला वाटायचे हे गरिबांचे जेवण आहे, असे वक्तव्य काश्मीर फाइल्स, केरळा स्टाेरीसारख्या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहाेत्री यांनी केले आहे. पण नंतर माझ्या लक्षात आले की, वरण भात हे अत्यंत पौष्टिस आणि साधे जेवण आहे. अशी सारवासारवही त्यांनी केली. मात्र, या वक्तव्यामुळे अग्निहाेत्री ट्राेल हाेऊ लागले आहेत.Vivek Agnihotri–Pallavi Joshi
‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अग्निहाेत्री यांनी मराठमोळी पत्नी पल्लवी जोशीसमोर महाराष्ट्रातील सर्वात आवडता पदार्थ वरण-भाताला ‘गरिबांचे जेवण’ म्हटलं आहे.Vivek Agnihotri–Pallavi Joshi
विवेक अग्रिहोत्रीने काम्या जानीला मुलाखत देताना वरण भाताबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘मी दिल्लीतून आलो होते आणि तिथे तंदुरी, कबाब, चिकन असं मसालेदार जेवण नेहमी खाल्ले आणि इथे गेल्यावर हे म्हणाले वरण भात खा, माझं नवीनच लग्न झालं होतं. मी वरण भात खाल्ला, मग कढी खायला सांगितली, मराठी लोकांची कढी म्हणजे तर खाऊन मला वाटलं की, हे तर शेतकऱ्यांसारखं गरीब लोकांचं जेवण जेवतात..
वरणभाताबद्दल बोलताना विवेक अग्रिहोत्री यांनी सांगितले की, ‘माझ्यासाठी वरण भात हा एकदम कल्चरल शॉक होता, इतके साधे जेवण! मला वाटायचे हे गरिबांचे जेवण आहे, पण नंतर माझ्या लक्षात आले की, वरण भात हे अत्यंत पौष्टिक आणि साधे जेवण आहे’, यावर पत्नी पल्लवी जोशीने किस्सा सांगत म्हटले की, पहिल्यांदा वरणभात खाल्ल्यावर विवेकच्या चेहऱ्यावरील हावभाव हे अत्यंत विचित्र होते. त्याने यात मसाला कुठे आहे? असा प्रश्न विचारला होता.
या संपूर्ण मुलाखतीपेक्षाही वरणभाताचा मुद्दा गाजत असून मराठी जेवणाला नावं ठेवण्याचा तुला कोणी हक्क दिला?, तुला आवडत नाही तर तू खाऊ नकोस, मराठी असूनही पल्लवीने हे कसं ऐकून घेतलं अशा प्रकारचे प्रश्न आता या व्हिडिओखाली युजर्स विचारताना दिसत आहेत, इतकंच नाही तर मराठमोळ्या काही कलाकारांनीही यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Vivek Agnihotri–Pallavi Joshi Land in Controversy After Calling ‘Varan Bhaat’ Poor Man’s Food, Terming It a Cultural Shock
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला