विशेष प्रतिनिधी
Mumbai News : पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार? असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिले आहे. की, मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले आहेत. जिथे पाणी साचलं होतं, तिथे आता पाणी राहिलेले नाही, असेही त्यांनी सांगितले.
आज सकाळपासूनच पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. आरे ते वरळी मार्गावर धावणाऱ्या अॅक्वा लाईन भुयारी मेट्रो पूर्णपणे सुरक्षित असून पावसात त्याठिकाणी काहीच होणार नाही, असा दावा महायुती सरकारकडून करण्यात आला होता. मात्र आज पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोच्या स्थानकांची भयाण अवस्था पाहायला मिळत आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अॅक्वा लाईन भुयारी मेट्रो स्टेशनला भेट देत मेट्रोच्या कामाची पोलखोल केली.
आदित्य ठाकरे म्हणाले की, स्टेशनवरील प्रशासन सांगतंय की, मेट्रो स्टेशनचं काम अद्यापही सुरू आहे. जर काम सुरू आहे तर कोणत्या स्टेशनचं उद्घाटन केलं आणि का? असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरे यांनी दादरच्या हिंदमाता परिसरात साचलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. त्यांनी म्हटले की, आम्ही 4 वर्षांपूर्वीच हा परिसर वॉटर लॉगिंग फ्री केला होता. मात्र, भाजपाने मुंबई महापालिकेवर नियंत्रण मिळवल्यानंतर सध्याची परिस्थिती पाहायला मिळत आहे. कारण, महापालिकेनं पावसाळ्यापूर्व कुठलीही तयारी केली नाही. भाजपाच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलं, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ही पोलखोल कशी काय? पाऊस जर 15 दिवस आधी पडला तर काय होणार? असे उलट प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट पाहिले आहेत. जिथे पाणी साचलं होतं, तिथे आता पाणी राहिलेले नाही.
10 जूननंतर मुंबईत पाऊस येतो आणि आपण तशी तयारी करत असतो. पण आज नरिमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही काळजी घेत आहोत. मुख्यमंत्री संपर्क ठेऊन आहेत, यंत्रणा अलर्टवर आहे. माहिम भागात म्हाडा इमारतीचा काही भाग कोसळला आहे, परंतु तेथील लोकांना सुरक्षितरित्या दुसरीकडे पाठविण्यात आलं आहे. पण आधीच पाऊस पडल्यामुळे थोडी गैरसोय झाली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
What will happen if the rain falls 15 days earlier? Deputy Chief Minister Eknath Shinde reply to Aditya Thackeray
महत्वाच्या बातम्या