Aditya Thackeray : आमच्यासारखे नॉन व्हेज खाणारे लोक त्यादिवशी काय खाणार? 15 ऑगस्ट मांसाहार बंदीवर आदित्य ठाकरे यांचा सवाल

Aditya Thackeray : आमच्यासारखे नॉन व्हेज खाणारे लोक त्यादिवशी काय खाणार? 15 ऑगस्ट मांसाहार बंदीवर आदित्य ठाकरे यांचा सवाल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनेक लोक व्हेज खातात त्यांना विरोध नाही. पण जे आमच्यासारखे नॉन व्हेज खाणारे लोक आहेत, जे कल्याण डोंबिवलीमध्ये आगरी-कोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी? आणि आमच्या राज्यात येऊन तुम्ही हे व्हेज खाण्याचे लादत आहात का? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
स्वातंत्र्य दिनानिमित्त कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रातील सर्व लहान आणि मोठ्या जनावरांचे कत्तलखाने बंद ठेवण्यात येणार आहेत, असे आदेश कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून जारी करण्यात आले. त्यानुसार 15 ऑगस्टला रात्री 12 पासून 15 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंत पर्यंत प्राण्यांची कत्तल करू नये, असे आदेश महापालिकेने दिले आहेत. शिवाय मांस विक्रीही या दिवशी करू नये असे महापालिकेने सांगितले आहे. जनावरांची कत्तल आणि मांसविक्री केल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.



आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही याचा कडकडून विरोध करू. 15 ऑगस्टच्या दिवशी व्हेज खा नाहीतर नॉन व्हेज खा हे सांगण्याचा अधिकार या महानगरपालिकांना नाही आणि आयुक्तांनाही नाही. लोकांनी काय करावे, काय करू नये, काय खावे किंवा काय खाऊ नये हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही.

आदित्य ठाकरे म्हणाले, बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात म्हणून एकेकाळी भाजप सुद्धा अग्रेसर होता. आता त्यांनी जिंकायचे रसायन काढले आहे त्यामुळे तुम्ही आता बॅलेट काय चंद्रावर पण मतदान घ्या तिथे जाऊन लोक मतदान करून येतील अशी सिस्टम त्यांनी बसवली आहे. शकुन राणे नामक व्यक्ती 5 वेळा मतदान करत आहेत, एक बाई आहेत 124 वर्षांच्या, जगातल्या सर्वात वयस्कर महिला, दिसतात 25 सारख्या पण वय आहे 124. हे असे सगळे घोळ आम्ही पकडले आहेत.

निवडणूक आयोग व्हीव्हीपॅट काढण्याच्या तयारीत

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आता व्हीव्हीपॅट सुद्धा काढून टाकण्याच्या तयारीत निवडणूक आयोग आहे. आता निवडणूक आयोगाने ठरवले पाहिजे की निवडणुका घ्यायच्या आहेत की त्यांच्या ओळखीतले जे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचे की हेच जिंकले. निवडणूक आयोग दिल्लीत बसते, निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

What will non-vegetarians like us eat on that day? Aditya Thackeray questions on August 15th ban on non-vegetarian food

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023