विशेष प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येण्यावरूनही अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा होत असते. यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांनी आपले काका उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांना एकत्र येण्याबाबत अट घातली आहे.
राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली. मोठ्या संख्येने आमदार अजित पवारांसोबत गेले. लोकसभा निवडणुकीत अपयश आले, तरी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारली. अजित पवार पुन्हा उपमुख्ममंत्री झाले. अजित पवारांसोबत जे आमदार गेले, ते आता सत्तेत असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील आणखी काही नेते त्यांची साथ सोडताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात चलबिचल सुरू आहे.
एकत्र येण्याशिवाय पर्याय नसला तरी राेहित पवार यांनी त्यासाठी अट घातली आहे. रोहित पवार म्हणाले की, तुम्हाला एकच सांगतो की, आम्ही भाजपाच्या विरोधात आहोत. भाजपाच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. त्यामुळे जर अजित पवारांनी भाजपाची साथ सोडली आणि शरद पवार यांच्यासोबत पुरोगामी विचारासोबत ते आले, तर त्यावेळेस आम्ही विचार करू. पण, अजित पवार जर भाजपासोबत असतील तर आम्ही एकत्रित येऊच शकत नाही. भाजपाला त्यांनी सोडले, तर सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आपण काय करायचे तो विचार केला जाईल आणि निर्णय घेतला जाईल, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधींनी उघडपणे पुराव्यानिशी मतांची चोरी झाल्याचे सांगितले. आमच्याकडे सुद्धा पुरावे आहेत, टप्प्याटप्प्याने समोर येणार आहोत. मतांची चोरी म्हणजेच लोकशाहीची चोरी आहे. लोकशाहीची चोरी होत असेल तर, गरिबांना न्याय देता येणार नाही. निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना अनेक प्रलोभन दिले. कर्जमाफी असो, बोनस असो, त्यात अजूनही त्यांनी शेतकऱ्यांना मदत दिलेली नाही. आश्वासने पाळली गेलेली नाहीत. आमच्यासोबत जे आहेत ते संपूर्ण निष्ठावान आहेत. त्यामुळे येत्या काळात यश नक्कीच येणार, अशा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला.
Will Pawar uncle and nephew come together, only if nephew abandon BJP?
महत्वाच्या बातम्या
- ब्राझीलच्या राष्ट्रपतींचा PM मोदींशी संवाद; म्हणाले होते- मी ट्रम्पशी नाही तर मोदींशी बोलेन
- AI Avatar ब्रिटनचा पहिला ‘व्हर्च्युअल खासदार’: नागरिकांशी संवाद साधण्यासाठी खासदाराचा AI अवतार
- National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण
- Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला