विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीतील निर्भया प्रकरणासारखाच भीषण प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईत गोरेगाव पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून निर्दयी हल्ला करण्यात आला. सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला करून तिला जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोराने पळ काढला.
एका अज्ञात रिक्षाचालकाने पीडितेवर हल्ला केल्याचा अंदाज आहे. पीडित तरूणी मुंबईतील राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली आहे. या पिडित तरूणीच्या गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही घालण्यात आले होते. गोरेगाव पूर्वेत वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. पुढील तपास वनराई पोलीस करत आहे.
गोरेगाव पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्यावरती निर्दयीपणे हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचबरोबर एका अज्ञात रिक्षाचालकांने असे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन तरूणीला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. ही तरूणी तिथे कशी आली, रिक्षाचालकाने तिला कोणत्या परिसरातून आणलं, नेमकं काय घडलं, याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.
woman sexually assaulted and attacked with caesarean blade
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा कालच्या भाषणात रोख कोणाकडे होता? षडयंत्र कोणी रचले? छगन भुजबळ यांचा सवाल
- Donald Trump ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष; प्रत्येक धोक्यापासून अमेरिकन संविधानाचे रक्षण करण्याची घेतली शपथ
- Rahul Shewale : दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, राहुल शेवाळे यांचा टोला
- कसला उदय होणार? तथ्यहीन बातम्या, अजित पवार यांनी फटकारले