विशेष प्रतिनिधी
पुणे : Vidya Sahakari Bank : गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणूक ही पुण्याची परंपरा आणि सांस्कृतिक ओळख आहे. या मिरवणुकीत मागील २८ वर्षांपासून पोलिस, सुरक्षा दल आणि महानगरपालिकेच्या सेवकांसाठी विद्या सहकारी बँक विशेष उपक्रम राबवत आहे.
पोलिस श्रमपरिहार केंद्र या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत मिरवणूक सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत पोलीस कर्मचारी आणि इतर सेवकांना नाश्ता, जेवण व चहाचे वाटप केले जाते. संपूर्ण बँक सेवक वर्ग यात उत्साहाने सहभागी होतो.
शनिवार, ६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता अलका टॉकीज चौक, सभांजी पोलीस चौकी मागे या ठिकाणी या उपक्रमाचे उद्घाटन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. यावेळी पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी उपक्रमाची रूपरेषा मांडली. आयुक्तांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. आयुक्त अमितेश कुमार यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले की, “शिक्षकांनी स्थापन केलेल्या बँकेमार्फत होणारा हा उपक्रम स्तुत्य असून बँक सेवक वर्गाचा वेळ आणि योगदान हे तितकेच मौल्यवान आहे.”
या प्रसंगी उपाध्यक्ष नितीन किवळकर, महेश ढमढेरे, डॉ. गौतम बेंगाळे, संजय मयेकर, संचालिका अनिता जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पाटणकर व इतर संचालक, सेवक वर्ग उपस्थित होते.
१९७४ साली शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या बँकेच्या पुणे आणि परिसरात मुख्य कार्यालयासह १३ शाखा व ८ एटीएम कार्यरत आहेत. बँकेचा एकूण व्यवसाय सध्या ७०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून बँकेस ‘अ’ वर्ग ऑडीट प्राप्त झाला आहे.
28th consecutive year of Vidya Sahakari Bank’s Police Shramparihar initiative
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा