विशेष प्रतिनिधी
पुणे : विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्धांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतु पुणे पोलिसांनी यावर लगेचच कठोर कारवाईला सुरुवात केली. Ayush Komkar
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकर यांचा मुलगा आयुष कोमकर याची गोळी झाडून हत्या केली. आयुष कोमकर क्लासमधून परत येत असतांना अमन पठान आणि यश पाटील या दोघांनी त्याच्यावर गोळीबार केला.
या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंदेकर टोळी मधील बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक केली आहे. हे सर्वजण बुलढण्याला पळून जाण्याची तयारी करत असतांनाच पोलिसांनी यांना अटक केली. यामध्ये बंडू आंदेकरच्या मुलीसह दोन नातवांचा देखील समावेश असल्याचं बोललं जात आहे. Ayush Komkar
आयुष कोमकर हत्या प्रकरणात एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये माजी नगरसेवक लक्ष्मी आंदेकरांसाह आणखी एका महिलेचा समावेश आहे. यातील दोन जणांना पोलिसांनी लगेचच अटक केली होती. ज्यात यश पाटील आणि अमित पाटोळेचा समावेश आहे. अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात सादर करून त्यांचा ‘पीसीआर’ देखील घेण्यात आला होता.
काल या प्रकरणातील अमन पठाण आणि सुजल मेरगु या दोन आरोपींना देखील पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तर, बंडू आंदेकर सह आणखी तीन मुख्य आरोपींना पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातून अटक केली आहे. ज्यात वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर आणि स्वराज वाडेकर यांचा समावेश आहे. काल (ता.८) रात्रीच्या सुमारास सापळा रचत पोलिसांनी यांना अटक केली व आज पहाटे त्यांना पुण्यात आणले गेले. Ayush Komkar
यातील यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण आणि सुजल मेरगु यांचा या गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक केली आहे.
हत्या प्रकरणात नेमके कोणावर गुन्हे दाखल आहेत?
या प्रकरणात जरी ८ जणांना अटक झाली असली तरी गुन्हा मात्र एकूण १३ जणांवर दाखल करण्यात आला आहे. ज्यात बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शुभम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्षी आंदेकर, वृंदावनी वाडेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, अमन पठाण, सुजल मेरगु, यश पाटील आणि प्रकाश पाटोळे अशा १३ जणांचा समावेश आहे. Ayush Komkar
गॅंग वॉरचं नेमकं प्रकरण काय?
मागील वर्षी १ सप्टेंबर २०२४ रोजी नानापेठेत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यात आला. त्यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करून त्यांना मारण्यात आले होते. या प्रकरणात वनराज यांच्या बहिणीचा दीर असलेला गणेश कोमकर हा मुख्य आरोपी होता. Ayush Komkar
या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गोविंद कोमकर याला लक्ष्य केल्याचं म्हटलं जात आहे. विशेष बाब म्हणजे टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष लक्ष्य मात्र दुसऱ्याच ठिकाणी साधले. त्यामुळे खून रोखण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना अपयश आले आहे. परंतु पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली आहे.
यासोबतच पोलिसांनी आंदेकर टोळी बाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबद्दल समर्थ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. Ayush Komkar
A total of 8 people arrested in the Ayush Komkar case!
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा