Pune : विसर्जनादरम्यान पुण्यात तब्बल ९२३ टन निर्माल्य जमा!

Pune : विसर्जनादरम्यान पुण्यात तब्बल ९२३ टन निर्माल्य जमा!

Pune

विशेष प्रतिनिधी 

पुणे : Pune  दोन दिवसांपूर्वीच पुण्यात मोठ्या उत्साहात गणपती विसर्जन पार पडलं. तब्बल ३८ तास विसर्जन मिरवणूक चालली आणि लाखो मूर्तींचे विसर्जन देखील करण्यात आले. मूर्ती विसर्जनासोबतच पुण्यात मोठ्या प्रमाणात निर्माल्य देखील जमा करण्यात आले. Pune 



पुणे शहरात यावर्षी मोठ्या प्रमाणात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले परंतु यातील बऱ्याच पर्यावरण पुरक मूर्ती होत्या. तसेच यावर्षी पुणे महापालिकेने नागरिकांना नद्या आणि कालव्यांमध्ये विसर्जन करण्यापेक्षा, कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करण्याचे आवाहन केले होते. पुणेकरांनी याला प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.

यावर्षी गणेश उत्सवादारम्यान पुणे शहरात ६,५४,४१० हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. जे गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळ जवळ एक लाखाने जास्त आहे. तसेच १,७८,३७६ मूर्तींचे विसर्जन करण्याऐवजी दान करण्यात आले. केवळ विसर्जनाच्या दिवशीच एकूण ४.४७ लाखांहून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. २०२४ मध्ये एकूण ५.५९ लाख मूर्तींचे विसर्जन झाले होते तर १.७६ लाख मूर्ती दान करण्यात आल्या होत्या. Pune 

पुणे महानगरपालिकेने केवळ कृत्रिम विसर्जन तलावच नाही तर, निर्माल्य संकलनासाठी विशेष संकलन केंद्रे उभारली होती. या संकलन केंद्रांनाही पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. पुण्याने शहरातील विविध भागातून ९,२३,३९८ किलो (९२३ टन) निर्माल्य गोळा केले. २०२३ मध्ये ६५० टन आणि २०२४ मध्ये ७०६ टन च्या तुलनेने ही लक्षणीय वाढ आहे. हे साहित्य नद्यांमध्ये जाऊ नये म्हणूनच महानगरपालिकेने विस्तारीत शहरी भगत विशेष संकलन केंद्रे उभारली होती आणि जागरूकता मोहीम राबवली होती.

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, गोळा केलेल्या निर्माल्याचे खतात रूपांतर केले जाईल. तसेच या तयार केलेल्या खताचे शेतकऱ्यांमध्ये मोफत वाटप केले जाईल. नागरी अधिकाऱ्यांनी चांगल्या पायाभूत सुविधा पुरवल्यास त्याला सामाजिक गटांकडूनही तितकेच सहकार्य मिळते हे यावर्षीच्या गणेशोत्सवात प्रकर्षाने जाणवले. Pune 

As many as 923 tons of Nirmalya accumulated during Pune immersion!

महत्वाच्या बातम्या

 

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023