विशेष प्रतिनिधी
बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांना संधी देण्यात आली आहे. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीपूर्वीच अजितदादांनी अध्यक्षपद आपण स्वतःकडेच घेणार असल्याचे जाहीर केले होते.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजितदादांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनल आणि ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे व रंजन तावरे यांच्या नेतृत्वातील सहकार बचाव शेतकरी पॅनलमध्ये लढत झाली. या निवडणुकीमध्ये निळकंठेश्वर पॅनलने २१ पैकी २० जागांवर विजय मिळवत कारखान्याची सत्ता अबाधित ठेवली. विरोधी पॅनलमधून केवळ चंद्रराव तावरे यांचा विजय झाला.
प्रचाराचा शुभारंभ करतानाच अजितदादांनी आपण स्वतः कारखान्याचे अध्यक्ष होणार असल्याचं जाहीर केलं होतं.
- Eknath Shinde : चर्चेत राहण्यासाठी नाना पटोलेंचा प्रयत्न होता का?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल
माळेगाव कारखान्यावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी अजितदादांचा, तर उपाध्यक्षपदासाठी संगीता बाळासाहेब कोकरे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. दोन्ही पदांसाठी एकेकच अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी जाहीर केले.
अजितदादांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदापासून केली होती.
Ajit Pawar ekected as the chairman of Malegaon Cooperative Sugar Factory
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी