विशेष प्रतिनिधी
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे आधीच चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात त्यांनी चक्क तोतया बँक अधिकारी उभे करून जेसीबी मशीन बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या धक्कादायक प्रकारानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, हगवणे कुटुंबीयांच्या आर्थिक गैरव्यवहाराची मालिका पुढे सुरूच असल्याचे संकेत मिळत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये योगेश राजेंद्र रासकर (२५), गणेश रमेश पोतले (३०) आणि वैभव मोहन पिंगळे (२७) यांचा समावेश आहे. या तिघांनी बँक कर्मचारी असल्याचे भासवत प्रशांत येळवंडे यांची फसवणूक करून त्यांच्या मालकीची जेसीबी मशीन परस्पर ताब्यात घेतली.
- Devendra Fadnavis : आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संयमी जीवनशैली आवश्यक, देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, प्रशांत येळवंडे यांनी लता आणि शशांक हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांत जेसीबी मशीन विकत घेतली होती. सर्व व्यवहार रीतसर पार पडूनही, काही दिवसांनी काही व्यक्ती बँकेचे अधिकारी असल्याचा बनाव करून येळवंडे यांच्या घरी पोहोचले आणि जेसीबीवर कर्ज थकबाकी असल्याचे सांगून मशीन परस्पर उचलून नेली.
या घटनेमुळे संशय बळावल्यावर येळवंडे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ तपास करून याआधीच लता आणि शशांक हगवणे यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून पुढे आलेल्या माहितीवरून तिघा बनावट बँक कर्मचाऱ्यांनाही बेड्या ठोकण्यात आल्या.
हा प्रकार केवळ फसवणुकीपुरता मर्यादित नसून, खोटे बँक कागदपत्रे सादर करणे, खोटे प्रतिनिधी पाठवणे आणि मालमत्तेचा बेकायदेशीर ताबा घेणे या गंभीर गुन्ह्यांत हगवणे कुटुंबीयांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून, या टोळीने अशा प्रकारच्या आणखी किती फसवणुका केल्या आहेत, याचा तपास सुरू आहे.
Another act of the Hagavane family, illegal possession of JCB by sending impersonating bank officials; Police arrest three
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan : तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली, गिरीश महाजन यांचा संजय राऊत यांच्यावर पलटवार
- Rupali Chakankar : रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत? सुषमा अंधारे यांचा सवाल
- Aditi Tatkare : सरकारी महिला कर्मचारी लाडकी बहीण लाभ चार महिन्यांपूर्वीच बंद, आदिती तटकरे यांची माहिती
- Raju Shetti : शेतकऱ्यांची भिकाऱ्याशी तुलना करणाऱ्या माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळात ठेवू नका, राजू शेट्टी यांची मागणी