विशेष प्रतिनिधी
पुणे : Ayush Komkar murder case : आयुष कोमकर हत्या प्रकरणात कुख्यात बंडू आंदेकर याच्यासह टोळीतील आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि समर्थ पोलिसांच्या पथकांनी ही कारवाई केली. टोळीयुद्धातून आयुष कोमकर याच्या विसर्जन मिरावणुकीच्या आदल्या दिवशी हत्या झाली होती. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने गणेश कोमकर याचा १९ वर्षीय मुलगा आयुष याचा खून केला. यामध्ये सुरुवातीला यश पाटील, अमित पाटोळे, अमन पठाण आणि सुजल मिरगू यांना अटक करण्यात आली होती. रेकी करणे तसेच गोळीबार करणे यांसारख्या कृत्यांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यानंतर गुन्हे शाखेने बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावणी वाडेकर यांना अटक केली आहे. तर पाच आरोपींचा शोध सुरू आहे . अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख यांनी ही माहिती दिली
Ayush Komkar murder case; 8 people including Bandu Andekar arrested
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा